-
आगामी आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची गोषणा झाली आहे आणि या यादीत भारतीय संघात दोन यष्टीरक्षकांची निवड करण्यात आली आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
बीसीसीआय ने संघात ऋषभ पंत आणि संजू सॅमसन या दोन्ही खेळाडूंना यष्टीरक्षक म्हणून सामील केले आहे, या संबंधित सर्वांना हाच प्रश्न आहे की विषचषकामध्ये यष्टीरक्षक म्हणून नक्की कोणाला संधी मिळणार. यासाठी जाणून घेऊया ऋषभ पंत आणि संजू सॅमसनचे टी-२० मधील रेकॉर्डस. (फोटो: आयपीएल अधिकृत वेबसाइट)
-
सध्या चालू असलेल्या आयपीएल सामन्यामध्ये ऋषभ पंतसाठी फिरकी गोलंदाजी अडचणीची झाली आहे. पण दुसरीकडे, संजू सॅमसन आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे फलंदाजीसह विकेट-कीपिंगमध्ये ही त्याचे प्रदर्शन चांगले आहे. (फोटो: आयपीएल अधिकृत वेबसाइट)
-
आपल्या आयपीएलमधील कामगिरीमुळे संजू सॅमसन भारतासाठी एक उत्तम किपरचा पर्याय असू शकतो. (फोटो: आयपीएल अधिकृत वेबसाइट)
-
ऋषभ पंतने आंतरराष्ट्रीय टी-२० चषकामध्ये १२६.३७ च्या स्ट्राइकरेट सह एकूण ९८७ धावा केल्या आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
संजू सॅमसनने आंतरराष्ट्रीय टी-२० चषकामध्ये १३३. ०९ च्या स्ट्राइकरेट सह एकूण ३७४ धावा केल्या आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी फलंदाजी करताना संजू सॅमसन स्पिनर आणि वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यात ही उत्तम कामगिरी केली आहे आणि आतापर्यंत आयपीएलमध्ये संजू सॅमसन एकाही फिरकीपटू कढून बाद झालेला नाही. (फोटो: आयपीएल अधिकृत वेबसाइट)
-
आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे संजू सॅमसन संघामध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो कारण अनेकदा पॉवरप्लेमध्ये स्पिनर्सला संधी दिली जाते आहे आणि स्पिनर्स विरुद्ध संजू सॅमसनने चांगले प्रदर्शन दर्शविले आहे. (फोटो: आयपीएल अधिकृत वेबसाइट)
-
आपल्या अपघातानंतर पुनरागमन करत आयपीएल २०२४ मध्ये ऋषभ पंतने फलंदाजी आणि विकेटकीपिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. (फोटो: आयपीएल अधिकृत वेबसाइट)

PBKS vs MI Qualifier 2 Live: श्रेयस अय्यरची बॅट तळपली, झळकावलं शानदार अर्धशतक; ४ षटकांत इतक्या धावांची गरज