-
टी-२० विश्वचषक २०२४ नंतर राहुल द्रविडचे भारतीय संघातून मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपणार आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
पुन्हा मुख्य प्रशिक्षकच्या कराराचे नूतनीकरण करण्यास राहुल द्रविडने नकार स्पष्ट केला आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
विश्वचषकाच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना द्रविडने स्पष्ट केले की, मुख्य प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करण्याची माझी इछा नाही.
(फोटो : इंडियन एक्सप्रेस) -
मध्यंतरी रंगलेल्या चर्चेनुसार पुढील मुख्य प्रशिक्षकपदासाठी माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा पर्याय विचारात घेतला होता मात्र बीसीसीआयने हा दावा फेटाळला आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
रिपोर्टनुसार बीसीसीआय ने भारतीय संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकसाठी गौतम गंभीरचा पर्याय निवडला आहे. (फोटो : गौतम गंभीर/अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
नुकत्याच झालेल्या आयपीएल हंगामात गौतम गंभीरने केकेआर संघाचे मार्गदर्शन करत त्यांना स्पर्धेत विजय मिळवून दिला. (फोटो : गौतम गंभीर/अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
यंदा केकेआर च्या विजेतेपदाचे श्रेय गौतम गंभीरला देण्यात आले आहे. (फोटो : गौतम गंभीर/अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
गौतम गंभीरने लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी ही मुख प्रशिक्षक म्हणून कामं केले आहे. (फोटो : गौतम गंभीर/अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
एका कार्यक्रमात गौतम गंभीरने सांगितले की, ”मला भारतीय संघाचे प्रशिक्षक व्हायला आवडेल. माझ्यासाठी त्यापेक्षा मोठा सन्मान कोणताच नाही.” (फोटो : गौतम गंभीर/अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
राहुल द्रविड नंतर व्हीव्हीएस लक्ष्मण हे देखील मुख प्रशिक्षकच्या जागेसाठी अपेक्षित आहे. जे वैयक्तिक कारणांमुळे गेल्या वर्षी अनुपलब्ध होते. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
बीसीसीआयच्या नियमांनुसार जर गंभीरला भारताचे नवे प्रशिक्षक बनायचे असेल तर गंभीरला केकेआर संघाचे प्रशिक्षकपद सोडावे लागेल. (फोटो : गौतम गंभीर/अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
२००७ मध्ये भारताच्या टी-२० विश्वचषक जिंकण्यापासून ते २०११ मध्ये विश्वचषक जिंकण्यापर्यंत गौतम गंभीर हा भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू होता. (फोटो : गौतम गंभीर/अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
गौतम गंभीरने २०१२ आणि २०१४ मध्ये केकेआर संघासाठी दोन आयपीएल विजेतेपद जिंकले आहेत. (फोटो : गौतम गंभीर/अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्