-
अभिनेत्री मंदिरा बेदीने टीव्ही आणि चित्रपटांमध्ये अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. जेव्हा त्यांनी क्रिकेटविश्वात क्रिकेट होस्ट म्हणून सुरुवात केली तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले होते.
-
खरंतर, त्या काळात क्रिकेट शोमध्ये महिला होस्ट क्वचितच दिसत होत्या, परंतु मंदिराने शोमध्ये केवळ होस्टची भूमिकाच केली नाही तर एका क्रिकेट एक्स्पर्टची भूमिकाही बजावली. पण सुरुवातीला मंदिराला क्रीडा जगात भेदभावाचा सामना करावा लागला होता.
-
ह्युमन ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याचा खुलासा केला आहे. अभिनेत्रीने असे सांगितले की ती एक आठवडा दररोज रडायची, त्यानंतर तिच्या आयुष्यात मोठे बदल झाले.
-
अभिनेत्रीने सांगितले की, तिला लहानपणापासूनच क्रिकेटची खूप आवड होती. मैत्रिणींसोबत ती क्रिकेटवर गप्पा मारायची. २००२ साली भारताने इंग्लंडचा पराभव करून चॅम्पियन ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. हा सामना पाहण्यासाठी तिने तिच्या मैत्रिणींकडून तिकीट मागितले होते आणि सामना पाहण्यासाठी ती कोलंबोला गेली होती.
-
यावेळी मंदिराने सोनी मॅक्सच्या प्रमुख स्नेहा रजनी यांची भेट घेतली आणि दोघांनीही क्रिकेटबद्दल खूप चर्चा केली. अभिनेत्रीने पुढे सांगितले की, मुंबईला परतल्यानंतर एका महिन्यानंतर तिला २००३ च्या विश्वचषकाचे आयोजन करण्यासाठी सोनीकढून फोन आला.
-
यासाठी हजारो मुलींनी ऑडिशन दिले होते, पण स्नेहा यांनी मंदिरा बेदीची निवड केली. मंदिराने पुढे सांगितले की, तिच्यासाठी होस्टिंग करणे सोपे नव्हते कारण ती पॅनेलमध्ये स्थान मिळविणाऱ्या पहिल्या काही महिलांपैकी एक होती.
-
“पॅनलवर बसलेले ज्येष्ठ लोक पॅनेलवर एका महिलेला बसवण्याच्या बाजूने नव्हते. मी काही प्रश्न विचारायचे, जरी माझे प्रश्न खूपच बालिश असले तरी पॅनेलवरील लोक त्याकडे दुर्लक्ष करायचे. मी खूप रडायचे आणि होस्टिंगदरम्यान अडखळत देखील होतो.” असं मंदिराने सांगितले.
-
अभिनेत्री पुढे म्हणाली, मला कोणाचाही पाठिंबा नव्हता. एका आठवड्यानंतर, मला समजावून सांगण्यात आले की सामान्य माणसाप्रमाणे क्रिकेटशी संबंधित प्रश्न विचारावेत. यानंतर मी स्वतःमध्ये बदल केले आणि मग मी क्रिकेटचा आनंद घेऊ लागले.”
-
मंदिरा बेदी यांनी २००३ मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप होस्ट केला होता. मंदिराने २००४ आणि २००६ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएल सीझन२ देलहिक कव्हर केले आहे.(फोटो : मंदिरा बेदी/इन्स्टाग्राम)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक