-
भारतीय संघाने २०२४ च्या टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. (Photo- ICC)
-
२९ जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत भारताने तब्बल १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. (Photo- ICC)
-
या विजयानंतर भारतीय संघ आज (४ जुलै) भारतात परतला आहे. ((Photo- BCCI)
-
भारतीय संघाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे. (Photo- ICC)
-
दिल्ली विमानतळावर चाहत्यांकडून स्वागतासाठी मोठी गर्दी करण्यात आली होती. (Photo- BCCI)
-
भारतीय संघ सध्या दिल्लीत पोहोचला आहे. (Photo- BCCI)
-
विमानतळावर चाहत्यांनी प्रेमाने बनवलेला केक कर्णधार रहित शर्माने कापला तो क्षण. (Photo- ANI)
-
प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही हा केक कापला. (Photo- ANI)
-
हार्दिक पंड्यानेही याठिकाणी केक कापला. (Photo- ANI)
-
विराट कोहलीनेही चाहत्यांचे मन राखत केक कापला. (Photo- ANI)
-
पण यापैकी कोणीही माध्यमांशी संवाद साधला नाही. (Photo- ANI)
-
विमानतळाबाहेर कर्णधार रोहित शर्मा ढोल ताशांच्या तालावर चाहत्यांसह नाचताना दिसला. (Photo- BCCI)
-
बसमधून बाहेरील चाहत्यांना रोहितने ट्रॉफी दाखवली. (Photo- BCCI)
-
बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांनी भारतीय संघाचे मायदेशी स्वागत केले. (Photo- BCCI)
-
छायाचित्रात रोहित आणि त्याचे कुटुंब दिसत आहे. (Photo- BCCI)
-
चाहत्यांनी रोहित आणि संघाचे स्वागत करताना फोटो काढले. चाहत्यांनी भारतीय संघाचा गणवेश परिधान केला होता. (Photo- BCCI)
-
रोहित शर्मा व जय शाह. (Photo- BCCI)
-
या बसमधून भारतीय संघ विमानतळावरून बाहेर पडला. (Photo- ANI)
-
थोड्याच वेळात भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय संघाबरोबर संवाद साधण्याची शक्यता आहे. (Photo- ANI)
-
यानंतर संपूर्ण भारतीय संघ मुंबईकडे रवाना होणार आहे. (Photo- ICC)
-
भारतीय संघाने २०२४ च्या टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावल्याच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी ५ वाजता भारतीय संघाचं मुंबईत जंगी स्वागत करण्यात येणार आहे. (Photo- ICC)
-
यासाठी मोठी तयारी करण्यात आलेली आहे. (Photo- ICC)
-
भारतीय संघ बुधवारी ग्रँटली अॅडम्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विशेष विमानाच्या साहाय्याने दिल्लीला दाखल झाला. (Photo- ICC)
-
यावेळी विमानतळावर चाहत्यांकडून स्वागतासाठी मोठी गर्दी करण्यात आली होती. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माकडे टी-२० विश्वचषकाची ट्रॉफी होती. दिल्ली विमानतळावरून भारतीय संघ आयटीशी मौर्या हॉटेलमध्ये दाखल झाला. दरम्यान, भारतीय संघ दिल्लीत पोहचताच चाहत्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. (Photo- ICC)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे या ‘रविवारी’ बँक सुरू ठेवण्याचे आदेश; मोठी घडामोड होणार…