-
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजे बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांची सून मयंती लँगर तिच्या ग्लॅमरस स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. मयंती एक प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर आहे ती स्टार स्पोर्ट्स चॅनलसाठी काम करते. मयंती देशातील टॉप अँकरपैकी एक आहे.
-
रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी भारतीय संघासाठी क्रिकेट खेळला आहे. स्टुअर्ट बिन्नी आणि मयंती लँगर २०१२ साली लग्न बंधनात अडकले. या दोघांची पहिली भेट इंडियन क्रिकेट लीग आयसीएल दरम्यान झाली होती.
-
मयंती आणि स्टुअर्ट बिन्नी यांची प्रेमकहाणी त्यांच्या पहिल्या मुलाखतीपासून सुरू झाली.
-
अनेकदा मयंतीला ट्रोलला सामोरे जावे लागले आहे करण ती क्रिकेटविश्वात पतीपेक्षा जास्त लोकप्रिय आहे.
-
मयंती लँगरचे वडील भारतीय लष्कराचे अधिकारी लेफ्टनंट जनरल संजीव लँगर आहेत. मयंतीच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे तर तिने दिल्ली विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने हिंदू कॉलेजमधून बीए इंग्लिश ऑनर्सचे शिक्षण घेतले आहे. ती महाविद्यालयीन फुटबॉल संघाकडून देखील खेळली आहे. २००६ मध्ये स्पोर्ट्स न्यूज चॅनल झी स्पोर्ट्समध्ये सामील झाल्यापासून मयंतीची स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंगमधील कारकीर्द सुरू झाली.
-
या क्षेत्रात यशस्वी झाल्यापासून ती भारतातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट अँकरपैकी एक बनली. तिने आयपीएल, आयसीसी एकदिवसीय आणि टी-२० विश्वचषक यासह अनेक प्रमुख क्रिकेट स्पर्धा कव्हर केल्या आहेत. २०१० मध्ये तिने फिफा विश्वचषकची अँकरिंग देखील केली. या कामगिरीसह ती पहिली भारतीय महिला क्रीडा अँकर बनली जीने फिफा विश्वचषक कव्हर केले. (फोटो : मयंती लँगर/इन्स्टाग्राम)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली