-
भारताच्या नीरज चोप्राकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. या वेळी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नीरज चोप्राने भालाफेकमध्ये चांगली कामगिरी केली, परंतु पुरुषांच्या भालाफेकमध्ये तो 89.45 मीटरच्या स्कोअरसह केवळ रौप्य पदक जिंकू शकला. (REUTERS फोटो)
-
त्याचवेळी पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर स्कोअर करत सुवर्णपदकावर कब्जा केला. भालाफेकच्या या स्टार खेळाडूंनी अभ्यासात कशी कामगिरी केली आणि या दोघांपैकी कोण जास्त शिक्षित आहे हे जाणून घेऊया. (पीटीआय फोटो)
-
भालाफेकपटू नीरज चोप्राचा जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावात झाला, त्याचे प्राथमिक शिक्षण बीव्हीएन पब्लिक स्कूलमधून झाले. (पीटीआय फोटो)
-
यानंतर नीरजने उच्च शिक्षणासाठी चंदीगड येथील दयानंद अँग्लो-वेदिक (डीएव्ही) कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, परंतु त्याने आपले शिक्षण अर्धवट सोडले. 2021 मध्ये त्याने पंजाबमधील जालंधर येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधून बीएची पदवी प्राप्त केली. (पीटीआय फोटो)
-
तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून रातोरात स्टार बनलेल्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमबद्दल बोलायचे तर त्याचा जन्म 2 जानेवारी 1997 रोजी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मियां चन्नू शहराजवळील एका छोट्या गावात झाला. (पीटीआय फोटो)
-
अर्शद शालेय जीवनात खूप चांगला खेळाडू होता. क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल आणि ऍथलेटिक्स यांसारख्या जवळपास सर्वच खेळांमध्ये त्याने आपला हात आजमावला आहे. (REUTERS फोटो)
-
अर्शद नदीमचे पहिले प्रेम क्रिकेट होते, पण त्याच्या कुटुंबीयांनी त्याला हा खेळ खेळण्यास मनाई केली. पुढे त्याने ॲथलेटिक्समध्ये हात आजमावला आणि भालाफेक हा खेळ आपलासा केला. (पीटीआय फोटो)
-
नदीम सातवीत असताना भालाफेकचा प्रवास सुरू झाला. त्याने त्याच्या खेळाने क्रीडा विकास प्रमुख रशीद अहमद साकी यांचे लक्ष वेधून घेतले. नदीमच्या उच्च शिक्षणाबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

पुढील २३ महिन्यांच्या काळात होणार नुसता धनलाभ; शनीदेवाचे गोचर ‘या’ तीन राशींना देणार करिअर,व्यवसायात यश