-
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माने शलाका मकेश्वरशी साखरपुडा केला आहे. जितेशने आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे ही गोड माहिती आपल्या चाहत्यांना दिली.
-
मीडिया रिपोर्ट्सवर जितेश आणि शलाका हे खूप दिवसांपासून एकमिकांना डेट करत होते.
-
जितेशने आपल्या इंस्टाग्रामवर या समारंभाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये जितेशने ८ ऑगस्ट रोजी साखरपुडा झाल्याचे सांगितले.
-
जितेशने कॅप्शनमध्ये त्याच्या प्रेमकहाणीमध्ये ८ अंकाचे कनेक्शन देखील जोडले. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, “आम्हाला आमचे कायमचेसाथ ८.८.८ ऑगस्ट २०२४ ला मिळाले.”
-
सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड आणि अनेक इतर खेळाडूंनी जितेश शर्मा आणि शलाका मकेश्वरला शुभेच्छा दिल्या.
-
जितेशची ही खास पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
शलाका मकेश्वरबद्दल सांगायचे झाले तर, शलाका ही नागपूरच्या ग्लोबल लॉजिक कंपनीत सीनियर टेस्ट इंजीनियरच्या पदावर आहे. तिने आपले शिक्षण प्रोफेसर राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट बडनेरा रेल्वेमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बी.ई. केले आहे. (फोटो : शलाका मकेश्वर/इन्स्टाग्राम)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल