रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अजून पर्यंत एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही आहे. यंदा आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी संघ आयपीएल विजेतेपद जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. यंदा आयपीएल लिलावात आरसीबी संघ काही खेळाडूंना संघात कायम राखू शकतात.जाणून घेऊया आरसीबी संघातील या प्रमुख खेळाडूंबाबत.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी कायम राखून ठेवलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहली ही पहिली पसंती आहे. विराट कोहली आयपीएलच्या सुरुवातीपासूनच या संघाचा भाग आहे आणि आयपीएलमध्ये विराटने त्याच्या उत्कृष्ट खेळीने विराटने २५२ सामन्यात ८००४ धावा केल्या आहेत.विराट कोहली आरसीबी संघाचा कर्णधारही राहिला आहे मात्र, गेल्या तीन वर्षांपासून तो संघात केवळ फलंदाज म्हणून खेळत आहे. संघातील युवा खेळाडूंसाठी त्याचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे.आरसीबी संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसबाबत बोलायचं झालं तर सध्या डू प्लेसिस हा संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. मात्र, हा ४० वर्षांचा खेळाडूने येत्या हंगामात आयपीएल खेळत राहणार की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही आहे.आरसीबी संघ यंदा रजत पाटीदारलाही कायम ठेवू शकते. रजत पाटीदार २०२१ पासून आरसीबी संघाचा भाग आहे. रजतने २७ सामन्यात ३४.७४ च्या सरासरीने ७९९ धावा केल्या आहेत.रजत पाटीदारने गेल्या वर्षी उत्कृष्ट कामगिरी केली होती. विराट कोहली आणि फाफसारखे अनुभवी फलंदाज बाद झाल्यानंतर संघाला मधल्या ओव्हरला रजतरसारख्या फलंदाजाची गरज आहे.विल जॅकने २०२३ मध्ये आरसीबी संघात सामील झाला आणि २०२४ मध्ये त्याच्या शानदार खेळीने त्याने ८ सामन्यात २३२ धावा केल्या.विल जॅकने २०२४ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध ४१ चेंडूत शतक झळकावले होते. आरसीबी या स्फोटक फलंदाजाला संघात कायम राखून ठेवू शकतो.