-
फुटबॉल विश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. लिव्हरपूल आणि पोर्तुगालचा स्टार खेळाडू डिओगो जोटा याचे निधन झाले आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
-
डिओगो जोटाचे गुरूवारी ( ३ जून) अपघाती निधन झाले आहे. (फोटो- इंस्टाग्राम )
-
डिओगो जोटाने वयाच्या २९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. डिओगो जोटासह त्याचा भाऊ देखील कार अपघातात मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर येत आहे.
( फोटो- इंस्टाग्राम) -
मुख्य बाब म्हणजे १० दिवसांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं.
(फोटो- इंस्टाग्राम) -
डिओगो जोटा आणि त्याचा भाऊ आंद्रे हे दोघेही स्पेनमधील सेर्नाडिला या भागात कारने प्रवास करत होते. त्यावेळी टायर फुटून गाडीला आग लागली. या आगीत त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
(फोटो- इंस्टाग्राम) -
या अपघातात डिओगो जोटासह त्याचा २६ वर्षीय भाऊ आंद्रे याने देखील आपला जीव गमावला आहे.
(फोटो- इंस्टाग्राम) -
डिओगो जोटा २२ जून रोजी रूट हिच्याशी विवाहबंधनात अडकला होता. ( फोटो- इंस्टाग्राम)

चॅनेलने ना बाहेर काढलं, ना डच्चू दिला…! शरद उपाध्येंच्या ‘त्या’ आरोपांवर निलेश साबळेचं प्रत्युत्तर; म्हणाला, “झी मराठी’मध्ये…”