-
वाढदिवसाच्या शुभेच्छा कूल कॅप्टन!
आज महेंद्रसिंग धोनीचा ४४ वा वाढदिवस! शांत स्वभाव, नेतृत्वगुण आणि खेळावरील प्रेम, यामुळे धोनी अजूनही लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. (छायाचित्र: ANI) -
तिन्ही आयसीसी ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार
महेंद्रसिंग धोनी हा असा एकमेव क्रिकेट कर्णधार आहे, ज्याने आयसीसीच्या तीनही मोठ्या ट्रॉफीज – टी-20 वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी भारतासाठी जिंकल्या आहेत. हा विक्रम आजपर्यंत कुणालाही जमलेला नाही. (छायाचित्र: एएनआय) -
स्टंपिंगचा बादशहा
माही केवळ फलंदाजच नव्हता, तर एक भन्नाट विकेटकीपरही होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १९२ स्टंपिंगचा विक्रम त्याच्याच नावावर आहे – कसोटीमध्ये ३८, वनडेत १२० आणि टी-२० मध्ये ३४ वेळा. (छायाचित्र: एएनआय) -
क्रिकेट नसते तर फुटबॉल गोलकीपर
क्रिकेटमध्ये येण्याआधी धोनीचा जीव फुटबॉलमध्ये अडकलेला होता. तो शाळेत गोलकीपर होता आणि फुटबॉलचा पक्का चाहता होता. आज तो क्रिकेटचा हिरो असला, तरी सुरुवात फुटबॉलपासूनच झाली होती. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस) -
सचिनने दिली प्रेरणा
धोनीने क्रिकेटमध्ये पाऊल टाकले ते फक्त सचिन तेंडुलकरमुळे. त्याच्या घरात सचिनची पोस्टर्स लावलेली होती आणि त्याचे बालपणीचे स्वप्न होते “एक दिवस मीही सचिनसारखा षटकार मारेन!” (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस) -
बाईकप्रेमी माही
धोनीला बाईक आणि सायकल्सची जबरदस्त आवड आहे. पहिल्या इंटर्नशिपचे पैसे मिळाल्यावर त्याने पहिली गोष्ट केली ती म्हणजे एक सेकंडहँड बाईक खरेदी. आज त्याच्याकडे महागड्या सुपरबाईक्सचा मोठा संग्रह आहे. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस) -
लेफ्टनंट कर्नल धोनी
फक्त क्रिकेटच नाही, तर देशसेवेची भावना ठेवणाऱ्या धोनीला २०११ मध्ये भारतीय लष्करात मानद लेफ्टनंट कर्नलचा दर्जा मिळाला. पॅराशूट रेजिमेंटमधून त्याने प्रशिक्षण घेतले आणि पॅरा जंपही यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस) -
बॅडमिंटन, WWE आणि माही
धोनी केवळ क्रिकेटर नाही, तर बॅडमिंटनमध्येही चांगला खेळाडू आहे. त्याला WWE फारच आवडते. त्याचे आवडते रेसलर्स ब्रेट हार्ट आणि हल्क होगन हे आहेत, हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटते! (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस)

टीकेनंतर एकनाथ शिंदे यांचा हेलिकॉप्टर दौरा रद्द; समाजमाध्यमांवर संताप, कारण मात्र मुसळधार पावसाचे