-
भारतीय क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी व लोकप्रिय कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज आपला ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. रांचीचा हा साधा; पण धडाडीचा खेळाडू केवळ यशस्वी कॅप्टनच नाही, तर देशाच्या क्रिकेट इतिहासात अमूल्य योगदान देणारा दिग्गज आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारताने क्रिकेटच्या मैदानावर अनेक ऐतिहासिक विजय मिळवले. (छायाचित्र स्रोत: @mahi7781/इंस्टाग्राम)
-
क्रिकेटमधील अपूर्व कामगिरीसाठी धोनीला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पद्मभूषण, पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न यांसारख्या मोठ्या सन्मानांनी त्याचा गौरव करण्यात आला. मैदानावरील त्याची शांतता, निर्णयक्षमता व नेतृत्वगुण यांमुळे त्याला आजही लाखो चाहते ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखतात.
(छायाचित्र स्रोत: @mahi7781/इंस्टाग्राम) -
राष्ट्रीय स्तरावरील गौरव
महेंद्रसिंग धोनी यांना त्यांच्या क्रिकेटमधील अपवादात्मक योगदानासाठी अनेक प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
पद्मभूषण (२०१८) – देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान, क्रिकेटमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान.
राजीव गांधी खेलरत्न (२००८) – भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान, क्रिकेटमधील अपूर्व कामगिरीमुळे केले गेलेले कौतुक.
पद्मश्री (२००९) – चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार, भारतीय क्रिकेटमधील योगदानाची दखल. (छायाचित्र स्रोत: @mahi7781/इंस्टाग्राम) -
ICC कडून जागतिक पातळीवर सन्मान
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कडूनही धोनीच्या कामगिरीची दखल घेतली गेली आहे.
स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड ऑफ द डिकेड (२०११-२०२०) – खेळातील प्रामाणिकपणासाठी सन्मान.
दशकातील सर्वोत्तम T20 संघ (२०११-२०२०) – कर्णधार व यष्टिरक्षक म्हणून निवड.
वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय संघात सातत्याने समावेश (२००६, २००८-२०१४) – २००९ ते २०१४ या काळात संघाचा कर्णधार.
वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू (२००८, २००९)– सलग दोन वेळा हा मान मिळविणारा पहिला खेळाडू. (छायाचित्र स्रोत: @mahi7781/इंस्टाग्राम) -
इतर महत्त्वाचे पुरस्कार
धोनीला केवळ खेळातच नव्हे, तर त्याने आपल्या कामगिरीने चाहत्यांच्या मनातही जागा मिळवली. त्यामुळेही त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
एलजी पीपल्स चॉइस अवॉर्ड (२०१३) – चाहत्यांच्या मतांवर आधारित.
कॅस्ट्रॉल इंडियन क्रिकेटर ऑफ द इयर (२०११) – क्रिकेटमधील उत्तम प्रदर्शनासाठी.
CNN-News18 इंडियन ऑफ द इयर (२०११) – देशातील महत्त्वाच्या कर्तृत्वासाठी सन्मान.
एमटीव्ही युथ आयकॉन ऑफ द इयर (२००६) – तरुणांमध्ये आदर्श ठरल्याबद्दल गौरव. (छायाचित्र स्रोत: @mahi7781/इंस्टाग्राम) -
विशेष सन्मान
धोनीला मैदानाबाहेरही अनेक प्रतिष्ठित सन्मान मिळाले आहेत.
मानद डॉक्टरेट (२०११) – डेटन विद्यापीठाने दिलेली, क्रिकेटमधील योगदानासाठी.
माननीय लेफ्टनंट कर्नल (२०११) – भारतीय सैन्याकडून प्रादेशिक सेनेमध्ये सन्माननीय पद. (छायाचित्र स्रोत: @mahi7781/इंस्टाग्राम)
-
धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची ऐतिहासिक कामगिरी
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुवर्णकाळ अनुभवला.
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ – धोनीने भारताला विजय मिळवून दिला आणि तिन्ही ICC ट्रॉफी जिंकणारा तो पहिला कर्णधार ठरला.
ICC विश्वचषक २०११ – २८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्याने भारताला क्रिकेट विश्वचषक जिंकून दिला.
आशिया कप (२०१०, २०१६) – भारताला आशिया खंडातील वर्चस्व मिळवून दिलं.
ICC T20 विश्वचषक २००७ – धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतानं पहिला T20 विश्वचषक जिंकला. (छायाचित्र स्रोत: @mahi7781/इंस्टाग्राम) -
आयपीएल आणि टी२० लीगमध्येही धोनीचा दबदबा
फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटच नव्हे, तर T20 लीगमध्येही धोनीने आपली छाप सोडली.
चेन्नई सुपर किंग्जला IPL विजेतेपद – २०१०, २०११, २०१८, २०२१ व २०२३ मध्ये CSK ला IPL विजेतेपद जिंकून दिले.
चॅम्पियन्स लीग टी-२० (२०१०, २०१४) – जागतिक टी-२० क्लब स्पर्धेतही यश मिळवले. (छायाचित्र स्रोत: @mahi7781/इंस्टाग्राम) -
ICC हॉल ऑफ फेममध्ये धोनीचा समावेश
२०२५ मध्ये धोनीला क्रिकेटमधील सर्वोच्च सन्मान म्हणजेच ICC हॉल ऑफ फेममध्ये त्याला स्थान मिळाले.
९ जून २०२५ रोजी लंडन येथे झालेल्या समारंभात त्याचा सत्कार करण्यात आला.
तो ‘हॉल ऑफ फेम‘मध्ये समाविष्ट होणारा ११ वा भारतीय खेळाडू ठरला. (छायाचित्र स्रोत: @mahi7781/इंस्टाग्राम)

Guru Purnima Horoscope: स्वामींच्या कृपेने प्रयत्नांना मिळेल साथ; हातून घडेल चांगले काम; वाचा गुरुवार विशेष तुमचे राशिभविष्य