-
ऋषभ पंत म्हणजे कमबॅक हिरो असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. मोठ्या अपघातातून सावरत कमालीचं पुनरागमन करणाऱ्या पंतने पायाला फ्रँक्चर असतानाही मँचेस्टर कसोटीत फलंदाजी केली.
-
वाघाच्या काळजाचा असलेल्या ऋषभ पंतने नीट चालताही येत नसताना देशासाठी पुन्हा मैदानावर उतरून फलंदाजी करत सर्वांनाच प्रभावित केलं.
-
ऋषभ पंतच्या आधी अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी दुखापत असताना मैदानावर उतरत देशासाठी सामन्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. हे खेळाडू कोण आहेत; पाहूया.
-
भारताचे दिग्गज क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांना २००२ मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध अँटिग्वा येथे झालेल्या कसोटीत जबड्याला दुखापत झाली होती. जबडा तुटलेला असतानाही पट्टी बांधून ते मैदानावर उतरले होते आणि १४ षटके गोलंदाजी केली होती. ज्यात त्यांनी ब्रायन लाराची मोठी विकेट घेतली होती.
-
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२०-२१ ही भारताच्या ऑस्ट्रेलियावरील शानदार विजयासाठी ओळखली जाते. या मालिकेदरम्यान, सिडनी कसोटीच्या चौथ्या डावात हनुमा विहारीला हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला होता. पण तरीही त्याने वेदनेशी झुंजत दिवसभर रविचंद्रन अश्विनसह फलंदाजी केली.
-
२०२१ मध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये सिडनी कसोटीदरम्यान, आर. अश्विनलाही दुखापत झाली होती. त्याला पाठीच्या दुखापतीमुळे तो वेदनेत होता. पण तरीही, त्याने विहारीसह ६२ धावांची भागीदारी करून भारताचा पराभव टाळला.
-
२०१८ मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय अष्टपैलू केदार जाधवला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. २२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला संघर्ष करत होता. पण जाधवने वेदना सहत करत झुंज दिली आणि सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर संघाला विजय मिळवून दिला.
-
२०२२ मध्ये, बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत असूनही फलंदाजी केली.
-
सचिन तेंडुलकरने १९८९ मध्ये पाकिस्तानविरूद्ध सामन्यात कसोटी मालिकेतून पदार्पण केले. या कसोटी मालिकेत वकार युनूसच्या बाऊन्सवर सचिनच्या नाकाला दुखापत झाली. नाकातून रक्त येत असतानाही सचिनने आपली खेळी चालू ठेवली.

Throat Cancer: घशाचा कॅन्सर होणार असेल तर दिसतात ही ५ लक्षणं; साधारण वाटणारी पण जीवघेणी, वेळीच ओळखलं तर वाचू शकतो जीव