-
नागपूरच्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने इतिहास घडवला आहे. तिने जॉर्जियातील बातुमी येथे पार पडलेल्या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत भारताच्या कोनेरू हम्पीला पराभूत करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
-
तिने FIDE विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात कोनेरू हम्पीवर टायब्रेकर फेरीत विजय मिळवत भारताची पहिली महिला विश्वविजेती होण्याचा मान पटकावला.
-
दिव्या देशमुखचा जन्म ९ डिसेंबर २००५ रोजी महाराष्ट्रात झाला. ती अशा कुटुंबात वाढली जिथे शिक्षण ही एक सामान्य गोष्ट होती. तिचे पालक डॉ. जितेंद्र आणि डॉ. नम्रता देशमुख दोघेही डॉक्टर आहेत. दोघांनीही दिव्याला अभ्यासाच्या वातावरणात शिकवले आणि शिस्तीकडेही पूर्ण लक्ष दिले.
-
डॉक्टरांच्या कुटुंबातून आलेली असूनही, तिला स्टेथोस्कोपमध्ये नाही तर बुद्धिबळाच्या पटात रस होता. दिव्याने तिचं प्राथमिक शिक्षण भवन्स भगवानदास पुरोहित विद्यामंदीर नागपूर येथून पूर्ण केलं आहे.
-
वयाच्या १० व्या वर्षी दिव्या राष्ट्रीय स्तरावरील विजेती बनली होती आणि परदेशातील तिच्या वयोगटातील स्पर्धांमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. खेळासोबतच, दिव्या तिच्या अभ्यासातही संतुलन साधत होती. तिचे शिक्षक आणि वर्गमित्र तिला वर्गातील सर्वात हुशार मुलींपैकी एक मानतात.
-
दिव्याने कधीही तिचा अभ्यास सोडला नाही. तिने दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षाही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. ती खेळांच्या फेऱ्यांदरम्यान बोर्ड परीक्षेची तयारी करायची.
-
दिव्याने बारावीनंतर कॉलेजमध्ये जाण्याऐवजी तिच्या बुद्धिबळावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. २०२५ मध्ये ती दूरस्थ शिक्षणाद्वारे (online) तिचे उच्च शिक्षण पूर्ण करत आहे.
-
दरम्यान, गेल्या वर्षी दिव्याने जागतिक ज्युनियर स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले होते.
-
तसेच भारतीय महिला संघाने पुरुषांबरोबरच बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले, त्या विजयात दिव्याचेही अमूल्य योगदान राहिले. हेही पाहा- 10 Most Powerful Earthquakes: लाखो मृत्यू – हजारो बेघर; क्षणात होत्याचं नव्हतं करणारे जगातले १० सर्वात मोठे भूकंप!

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”