-
आशिया चषक २०२५ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. २०२६ मध्ये टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा पाहता आगामी आशिया चषक स्पर्धेचे आयोजन टी-२० फॉरमॅटमध्ये केले जाणार आहे. दरम्यान कोण आहेत या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
श्रीलंकेचा माजी फलंदाज सनथ जयसूर्याच्या नावे या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. त्याने २५ सामन्यांमध्ये १२२० धावा केल्या आहेत.
( फोटो- इंडियन एक्स्प्रेस) -
भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. रोहितने २८ सामन्यांमध्ये १२१० धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या विराटच्या नावे १६ सामन्यांमध्ये ११७१ धावा करण्याची नोंद आहे.
(फोटो- इंडियन एक्सप्रेस) -
श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकाराने या स्पर्धेत फलंदाजी करताना २४ सामन्यांमध्ये १०७५ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत पाचव्या स्थानी असलेल्या सचिन तेंडुलकरने या स्पर्धेत एकूण ९७१ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पहिल्यांदाच EVMची फेरमतमोजणी; तीन वर्षांनंतर फिरला निवडणुकीचा निकाल