-
ICC Mend ODI Rankings – Batter : आयसीसीने त्यांची ताजी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये भारतीय सलामीवीर शुभमन गिल अव्वल स्थानावर आहे. या यादीत भारतीय फलंदाजांचे वर्चस्व आहे, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे देखील पहिल्या पाचमध्ये आहेत. पाकिस्तानचा बाबर आझम आणि न्यूझीलंडचा डॅरेल मिशेल यांच्यासह येथे टॉप १० एकदिवसीय फलंदाज आणि त्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊया. (Photo Source: PTI)
-
१) शुभमन गिल (भारत)
भारतीय कसोटी कर्णधार आणि एकदिवसीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिलची बॅट तळपताना दिसतेय. क्रिकेटच्या या दोन फॉरमॅटमध्ये त्याचं वर्चस्व आहे. गिल हा सर्वात जलद १५०० एकदिवसीय धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच २०२३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध द्विशतकही ठोकलं आहे. (PC : The Financial Express) -
२) रोहित शर्मा (भारत)
भारताचा एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा हा त्याच्या विक्रमी २६४ धावांसाठी प्रसिद्ध आहे. ही एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. मोठ्या खेळींमध्ये मास्टर असलेल्या रोहितने एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन द्विशतके केली आहेत आणि तो मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचा सर्वात विश्वासार्ह सलामीवीर आहे. (PC : The Financial Express) -
३) बाबर आझम (पाकिस्तान)
पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम हा त्यांच्या फलंदाजीचा कणा आहे. ५६ पेक्षा अधिक सरासरीने तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा जमवतोय. फक्त ९७ डावांमध्ये त्याने ५,००० एकदिवसीय धावा पूर्ण केल्या आहेत. सर्वात सर्वात जलद ५,००० धावा करण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याची सातत्यपूर्ण कामगिरी त्याला उत्कृष्ट खेळाडू बनवते. (PC : The Financial Express) -
४) विराट कोहली (भारत)
धावांचा पाठलाग करण्यात मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीने ५० एकदिवसीय शतके ठोकली आहेत. कोणत्याही खेळाडूने केलेली ही सर्वाधिक शतके आहेत. डावांना बळकटी देण्याची आणि धावांचा पाठलाग करण्याची ताकद त्याला सर्वोत्कृष्ट बनवते. कोहलीने सर्वात जलद ८,०००, ९,०००, १०,००० आणि १३,००० एकदिवसीय धावा करण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे. (PC : The Financial Express) -
५. डॅरेल मिशेल (न्यूझीलंड)
न्यूझीलंडचा मधल्या फळीचा स्टार फलंदाज डॅरेल मिशेल हा एकदिवसीय सामन्यांमध्ये एक वेगळाच खेळाडू आहे. डेथ ओव्हर्समध्ये भागीदारी आणि वेग वाढवण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जाणारा मिशेल २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांपैकी एक होता. त्याने भारताविरुद्ध दोन शतके झळकावली होती. (PC : The Financial Express) -
६) चरित असलंका (श्रीलंका)
श्रीलंकेचा चरित असलंका हा एक विश्वासार्ह आणि अवघड परिस्थितीत धावा करणारा फलंदाज म्हणून उदयास आला आहे, विशेषतः आशिया कप आणि विश्वचषक सामन्यांमध्ये त्याने उजवी कामगिरी केली आहे. आक्रमक स्ट्रोकप्लेमुळे तो श्रीलंकेच्या फलंदाजी क्रमाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे. (PC : The Financial Express) -
७) हॅरी टेक्टर (आयर्लंड)
आयर्लंडचा हॅरी टेक्टर हा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात हुशार युवा खेळाडूंपैकी एक आहे. त्याने अव्वल संघांविरुद्ध मोठ्या खेळी केल्या आहेत आणि आयर्लंडचा फलंदाजीचा मुख्य आधार बनला आहे. (PC : The Financial Express) -
८) श्रेयस अय्यर (भारत)
श्रेयस अय्यरने दबावाखालीही भारताच्या मधल्या फळीला शांततेने आधार दिला आहे. २०२३ च्या विश्वचषकात मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध झळकवलेले त्याचे शतक कारकिर्दीला कलाटणी देणारे होते. (PC : The Financial Express) -
९) इब्राहिम झाद्रान (अफगाणिस्तान)
इब्राहिम झाद्रान हा अफगाणिस्तानचा सर्वात सातत्यपूर्ण टॉप-ऑर्डर फलंदाज म्हणून उदयास आला आहे. २०२३ च्या विश्वचषकात मुंबई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकवलेल्या त्याच्या शतकाद्वारे त्याने जागतिक दर्जाच्या गोलंदांजांचा सामना करण्याची त्याची क्षमता दाखवून दिली आहे. (PC : The Financial Express) -
१०) कुसल मेंडिस (श्रीलंका)
कुसल मेंडिस हा श्रीलंकेचा विश्वासार्ह फलंदाज आहे. मोठ्या धावा करताना तो फलंदाजी विभागाचं इंजिन म्हणून काम करतो. त्याने २०२५ मध्ये पल्लेकेले येथे बांगलादेशविरुद्ध एक महत्त्वपूर्ण शतक झळकावले आणि संघातील सर्वात वरिष्ठ फलंदाज म्हणून त्याची भूमिका पुन्हा अधोरेखित केली. (PC : The Financial Express)

भाजपाचा बालेकिल्ल्यातच पराभव, काँग्रेसचा दणदणीत विजय; नगरपालिकेवर कशी मिळवली सत्ता?