-
रोहित शर्मा
आशिया कपच्या इतिहासात कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हिटमॅन रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याची विनिंग टक्केवारी ७८.६ होती. रोहितने स्पर्धेत १५ सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आणि ११ सामन्यांमध्ये विजय मिळवला. (Photo: Social Media) -
‘हिटमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने दोनदा (२०१८, २०२३) आशिया कप जिंकला. रोहितने कसोटी आणि टी२० आंतरराष्ट्रीय स्वरूपातून निवृत्ती घेतली आहे. (Photo: Social Media)
-
दासुन शनाका
आशिया कपमध्ये कर्णधार म्हणून श्रीलंकेच्या दासुन शनाकाचा विजयाचा टक्का ७५.० इतका आहे. धडाकेबाज अष्टपैलू शनाकाने स्पर्धेत १२ सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व केले आणि ९ सामन्यांमध्ये विजय मिळवला. त्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंका २०२२ मध्ये आशिया कप विजेता बनला. (Photo: Social Media) -
महेंद्रसिंग धोनी
माजी भारतीय कर्णधार आणि महान यष्टीरक्षक एमएस धोनी यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आशिया कपमध्ये त्याचा विजयाचा टक्का ७३.७ होता. धोनीने स्पर्धेत १९ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि १४ सामन्यांमध्ये विजय मिळवला. (Photo: Social Media) -
कर्णधार म्हणून त्याने आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दोनदा (२०१० आणि २०१६) आशिया कपचे विजेतेपद जिंकले. (Photo: Social Media)
-
मिसबाह-उल-हक
आशिया कपमध्ये कर्णधार म्हणून माजी पाकिस्तानी फलंदाज मिसबाह-उल-हकचा विजयाचा टक्का ७०.० इतका आहे. तो स्पर्धेत १० सामने कर्णधारपदावर राहिला. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने ७ सामने जिंकले. (Photo: Social Media) -
अर्जुन रणतुंगा
श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यादीत पाचव्या स्थानावर आहे. आशिया कपमध्ये त्याचा विजयाचा टक्का ६९.२ राहिला आहे. रणतुंगाने १३ पैकी ९ सामने जिंकले. त्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने १९९७ मध्ये आशिया कप जिंकला. (Photo: Social Media) हेही पाहा- जगातल्या सर्वात श्रीमंत ५ क्रिकेटपटूंमध्ये ३ भारतीय, ‘या’ खेळाडूकडे आहे कोहलीपेक्षा जास्त संपत्ती…