-
आठ हंगामात चार अंतिम सामन्यात खेळल्यानंतर चेतेश्वर पुजाराने २०२० मध्ये सौराष्ट्र संघाकडून रणजी ट्रॉफी जिंकली तेव्हा त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. (PC : TIEPL)
-
२०१६-१७ मध्ये भारताने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-१ असा मालिका विजय मिळवला होता. तेव्हा चेतेश्वर पुजारा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता. चार सामन्यांच्या सात डावांमध्ये त्याने ५७.८५ च्या सरासरीने ४०५ धावा फटकावल्या होत्या, ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. मालिकेतील त्याची सर्वोत्तम धावसंख्या २०२ होती. (PC : ANI)
-
२०१०-२०११ च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पुजारा केवळ एका सामन्यात खेळला होता. पदार्पणाच्या डावात फक्त चार धावा काढल्यानंतर, त्याने भारताच्या २०७ धावांच्या यशस्वी पाठलागात ७२ धावांचं योगदान दिलं होतं. ही मालिका भारताने २-० अशी जिंकली होती. (PC: ANI)
-
चेतेश्वर पुजाराच्या योगदानाचे चाहते असलेले माजी भारतीय कर्णधार आणि महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी त्याच्या १०० व्या कसोटी सामन्याच्या स्मरणार्थ त्याला एक खास टोपी भेट दिली होती. (PC: AP)
-
२०१९ मधील बॉर्डर-गावसकर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पुजाराने सिडनी येथे १९३ धावांची खेळी साकारली होती. (PC: AP)
-
नोव्हेंबर २०१६ मध्ये राजकोट येथे इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजाराने शतक साजरं केलं होतं. (PC: AP)
-
१५ जुलै २०२३ रोजी बंगळुरू येथे साउथ झोन आणि वेस्ट झोन यांच्यातील दुलीप ट्रॉफी फायनलच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी पुजारा बाद झाला अन् त्याच्या संघाने सामना गमावला. तो मैदानात असेपर्यंत सर्वांच्या आशा जीवंत होत्या. (PC : PTI) -
२१ जानेवारी २०२४ रोजी, चेतेश्वर पुजाराने नागपूर येथे विदर्भाविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात सौराष्ट्राकडून २०,००० प्रथम श्रेणी धावा पूर्ण करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला. हा पराक्रम करणारा तो केवळ चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला. (PC : PTI)
-
२ मार्च २०२३ इंदूरमध्ये झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान चेतेश्वर पुजाराने जबरदस्त खेळी साकारली होती २ मार्च २०२३ (PC: PTI)
-
शनिवार, १० जून २०२३ रोजी, लंडनमधील ओव्हल येथे झालेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या चौथ्या दिवशी, ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सच्या चेंडूवर चेतेश्वर पुजारा झेलबाद झाल्यानंतर मैदानाबाहेर गेला. (PC: AP)

आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल