-
नजीबुल्लाह झाद्रान
टी-२० आशिया कपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नजीबुल्लाह झाद्रानच्या नावे आहे. अफगाणिस्तानचा फलंदाज झाद्रानने स्पर्धेच्या टी-२० स्वरूपात ८ सामने खेळले आहेत आणि १३ षटकार मारले. (Photo: X) -
रहमानउल्लाह गुरबाज
अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक व फलंदाज रहमानउल्लाह गुरबाजने टी-२० आशिया कपमध्ये पाच सामन्यांमध्ये १२ षटकार मारले आहेत. तो २०२५ च्या टी-२० आशिया कपसाठी अफगाणिस्तान संघाचा भाग आहे. (Photo: X) -
रोहित शर्मा
‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माने टी-२० आशिया कपमध्ये ९ सामन्यांमध्ये १२ षटकार मारलेत. त्याने कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. (Photo: X) -
रोहित आता भारतासाठी फक्त एकदिवसीय सामने खेळू शकेल. तो भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. (Photo: X)
-
विराट कोहली
या यादीत स्टार फलंदाज विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने टी-२० आशिया कपमध्ये १० सामने खेळत ११ षटकार मारले. (Photo: X) -
कोहलीने कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. (Photo: X)
-
बाबर हयात
या यादीत हाँगकाँगचा फलंदाज बाबर हयात पाचव्या क्रमांकावर आहे. हयातने टी-२० आशिया कपमध्ये पाच सामन्यांमध्ये १० षटकार मारलेत. आशिया कप २०१६ मध्ये पहिल्यांदाच टी-२० स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. (Photo: X) हेही पाहा- Ganeshotsav 2025: अमृता धोंगडेचा गणेशोत्सवात सुंदर लूक, घरातल्या बाप्पाबरोबर काढले फोटो

Priya Marathe Passes Away: मनोरंजनसृष्टीवर शोककळा, प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचे कर्करोगाने निधन