-
सर्वाधिक विजय
यंदा २०२५ मध्ये आशिया चषकाचा १७ वा हंगाम युएईमध्ये खेळला जात आहे. स्पर्धेच्या सहाव्या सामन्यात पाकिस्तानला हरवून भारताने सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. श्रीलंका देखील भारतासोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे तर पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर आहे. (Photo: BCCI) -
भारताने जिंकले ४५ सामने
आशिया चषक हा एकदिवसीय आणि टी-२० स्वरूपात खेळला जातो. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत ४५ सामने जिंकले आहेत, जे दोन्ही स्वरूपातल्या आशिया कपच्या इतिहासातील सर्वाधिक सामने आहेत. भारताव्यतिरिक्त, श्रीलंकेनेही तेवढेच सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. (Photo: Social Media) -
श्रीलंका
भारताबरोबरच श्रीलंकेचा संघही अव्वल स्थानावर आहे. स्पर्धेच्या इतिहासात दोन्ही संघांनी प्रत्येकी ४५ सामने जिंकले आहेत. आता आशिया कप २०२५ च्या अखेरीस कोणता संघ आघाडी घेतो याकडेही लक्ष असणारच आहे. (Photo: Social Media) -
पाकिस्तान
भारताच्या व श्रीलंकेच्या तुलनेत, आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत पाकिस्तान खूपच मागे आहे. १९८४ मधल्या आशिया चषकाच्या पहिल्या आवृत्तीपासून पाकिस्तान या स्पर्धेत सहभागी आहे. मात्र त्याला आतापर्यंत ३४ सामनेच जिंकता आले आहेत. (Photo: Social Media) -
बांगलादेश
बांगलादेश हा आशिया चषकामधील चौथा सर्वात यशस्वी संघ आहे, ज्याने आतापर्यंत स्पर्धेत १३ सामने जिंकले आहेत. या संघाने आशिया कप २०२५ मध्येही एक सामना जिंकला आहे. (Photo: Social Media) -
अफगाणिस्तान
अफगाणिस्तानचा संघ या यादीत सर्वात खाली पाचव्या स्थानावर आहे. अलिकडच्या काळात या संघाने खूप प्रभावित केले आहे. अफगाणिस्तानने आतापर्यंत आशिया कपमध्ये ८ सामने जिंकले आहेत. (Photo: Social Media)

Nitin Gadkari Ethanol: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात, “माझ्या बुद्धीची किंमत महिन्याला २०० कोटी…”