-
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात आज भारताने ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सने पराभव केला.
-
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. फोबी लिचफिल्ड (११९) च्या शतक आणि अॅशले गार्डनर (६३) च्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ४९.९ षटकांत १० बाद ३३८ धावा केल्या होत्या.
-
ऑस्ट्रेलियाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताने जेमिमा रॉड्रिग्ज (नाबाद १२७ धावा) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (८९ धावा) यांच्या खेळीच्या जोरावर ४८.३ षटकांत ५ बाद ३४१ धावा केल्या.
-
या विजयासह, भारताने महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची आठ वर्षांची विजयी मालिका खंडित केली. ऑस्ट्रेलियन संघ यापूर्वी २०१७ मध्ये महिला विश्वचषकात पराभूत झाला होता. तेव्हापासून त्यांनी एकही सामना गमावलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे, २०१७ च्या महिला विश्वचषकातही भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले
-
२०२५ च्या महिला विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या विजयामुळे २ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात जगाला एक नवा विश्वविजेता मिळेल हे निश्चित झाले आहे.
-
२०२५ च्या महिला विश्वचषकाचा अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होईल. यापैकी कोणत्याही संघाने अद्याप विश्वचषक जिंकलेला नाही.
-
एकदिवसीय विश्वचषक नॉकआउटमध्ये (पुरुष किंवा महिला) ३०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पाठलाग करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
-
याआधीचा सर्वाधिक धावांचा पाठलाग २०१५ च्या पुरुष विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने ऑकलंडमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केला होता. न्यूझीलंडने २९८ धावांचा यशस्वीपणे पाठलाग केला होता.
-
भारताने तिसऱ्यांदा महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी, भारतीय संघ २००५ आणि २०१७ मध्ये उपविजेता ठरला होता. (All Photos: BCCI Women/X)
Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज