-
आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने पहिल्यादांच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेतील सेमीफायनलच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला धूळ चारून अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं. दरम्यान कसा होता दक्षिण आफ्रिकेचा या स्पर्धेतील प्रवास? जाणून घा. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात इंग्लंडकडून १० गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला ६ गडी राखून पराभूत केलं आणि स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. (फोटो- जनसत्ता)
-
स्पर्धेतील तिसरा सामना भारतीय संघाविरुद्ध पार पडला. हा सामनाही दक्षिण आफ्रिकेच्या हातून जवळजवळ निसटला होता. पण शेवटी दक्षिण आफ्रिकेने दमदार पुनरागमन करून विजय मिळवला.दक्षिण आफ्रिकेचा स्पर्धेतील चौथा सामना बांगलादेशविरुद्ध पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर ३ गडी राखून विजय मिळवला. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लागला होता. हा सामना दक्षिण आफ्रिकेने १० गडी राखून आपल्या नावावर केला. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर १५० धावांनी विजय मिळवून सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. त्यानंतर पुढील सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाकडून ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. (फोटो- जनसत्ता)
-
या स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना इंग्लंडविरुद्ध पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर १२५ धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
अगं बाई! साडीतील काकूंचा ठुमका पाहून थक्क झाले नेटकरी; VIDEO पाहून म्हणाले “आंटी तर लहानपणी…..