-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक आहे. मात्र येत्या काही दिवसात या संघाची मालकी बदलणार असल्याच्या चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. असं झाल्यास आरसीबीचा चेहरामोहरा बदलून जाईल. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळताना या संघाने पहिल्यांदाच जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. दरम्यान कोण आहेत या संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत युझवेंद्र चहल अव्वल स्थानी आहे. चहलच्या नावे या संघाकडून खेळताना ११३ सामन्यांमध्ये १३९ गडी बाद करण्याची नोंद आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
हर्षल पटेलला या संघाकडून ८० सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ९९ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
संघातील सर्वात विश्वासू गोलंदाज मोहम्मद सिराजला या संघाकडून ८७ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ८३ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर वेगवान गोलंदाज विनय कुमारने ७० सामन्यांमध्ये ८० गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचे अनुभवी गोलंदाज अनिल कुंबळे यांना या संघाकडून ५१ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्यांनी ५३ गडी बाद केले. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
Sharad Pawar on Parth Pawar: ‘९९ टक्के भागीदार तरीही पार्थ पवारांवर गुन्हा नाही?’; शरद पवार म्हणाले, “याचे उत्तर…”