-
पंतप्रधान नरेंद्र मोदी. (संग्रहित छायाचित्र)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी. (संग्रहित छायाचित्र)
-
फेसबुक >> पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फेसबुकवर अधिकृत पेज असून त्याला ४ कोटी ५७ लाख ८ हजारहून अधिक लाइक्स आहेत. या पेजवरुन मोदी सणांच्या शुभेच्छा देण्याबरोबर फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतात. पेजची लिंक >> facebook.com/narendramodi
-
ट्विटर >> ट्विटरवर पंतप्रधान मोदींचे अकाउंट आहे. @narendramodi हे त्यांचे हॅण्डल असू येथे त्यांना फेसबुकपेक्षा जास्त म्हणजे पाच कोटी ९२ लाख ५५ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या ट्विटरवरील नेत्यांपैकी ते एक आहेत. अकाउंटची लिंक >> twitter.com/narendramodi
-
युट्यूब >> जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म असणाऱ्या युट्यूबवरही मोदींचे अधिकृत अकाउंट आहे. सभेतील भाषणांपासून लाइव्ह टेलीकास्टच्या माध्यमातून ते यावरुन जनतेशी यावरुन संवाद साधतात. येथे त्यांचे ६७ लाख ५० हजारहून अधिक सबस्क्रायबर आहेत. अकाउंटची लिंक >> https://www.youtube.com/user/narendramodi
-
पिनट्रेस >> पिनट्रेस या सोशल नेटवर्किंग साइटवरही मोदींचे अधिकृत अकाउंट असून येथे त्यांचे १६ हजार २६० फॉलोअर्स आहेत. अकाउंट लिंक >> https://www.pinterest.com/NarendraModi/
-
फ्लिकर >> फ्लिकर डॉट कॉम या फोटो शेअर वेबसाईटवरही मोदींचे अकाउंट असून येथे त्यांना एक हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. २०१३ पासून या प्लॅटफॉर्मवर मोदींचे अकाउंट आहे. त्यांनी येथे एक हजार ६३८ फोटो शेअर केले आहेत. अकाउंट लिंक >> https://www.flickr.com/photos/92359345@N07
-
टंबलर >> टंबलर या सोशल नेटवर्किग साइटवरही मोदींचं अकाउंट आहे. मात्र येथे फारसे सक्रीय नाहीत. त्यांनी सहा वर्षांपूर्वी येथे एक नोट शेअर केल्याचे दिसते. अकाउंट लिंक >> https://narendra-modi.tumblr.com/
-
इन्स्टाग्राम >> इन्स्टाग्रामवरही मोदींचे अकाउंट असून त्याला ४ कोटी ३६ लाख ८८ हजार फॉलोअर्स आहेत. अकाउंट लिंक >> https://www.instagram.com/narendramodi/
-
लिंक्डइन >> लिंक्डइन या प्रोफेशनल साइटवरही मोदींचे अकाउंट आहे. अकाउंट लिंक >> https://in.linkedin.com/in/narendramodi
-
वीबो: मोदी २०१४ साली पंतप्रधान झाल्यानंतर २०१५ साली पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून चीन दौऱ्यावर जाण्याआधी चीनमध्ये लोकप्रिय असणाऱ्या विबोवर अकाउंट सुरु करण्यात आलं होतं. या अकाउंटवर २ लाख ४४ हजार फॉलोअर्स होते. यापैकी बहुतांशी फॉलोअर्स हे चिनी आहेत. मोदींनी २०१५ साली या अकाउंटवरुन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. बुधावारी या अकाउंटवरील मोदींचा फोटो, कव्हर फोटो सारे काही काढून टाकण्यात आलं आणि हे अकाउंट बंद करण्यात आलं आहे.
-
मिक्स >> मिक्स डॉट कॉम या सोशल नेटवर्किग साइटवरही मोदींचे अकाउंट असल्याची माहिती मोदींच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
-
या दहा सोशल मिडिया प्लॅटफॉर्मबरोबरच शिवाय मोदींची अधिकृत वेबसाईटही आहे. यावर मोदींसंदर्भातील सर्व माहिती उपलब्ध आहे. वेबसाईट लिंक >> https://www.narendramodi.in/
-
याशिवाय मोदींचे गुगल प्ले स्टोअर आणि अॅपलच्या प्लॅटफॉर्मवर अॅपही आहे.
-
एकंदरितच मोदी हे ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रचंड लोकप्रिय आहेत असंच ही सारी आकडेवारी पाहून म्हणता येईल.

“किती गोड!”, ‘आई नहीं’ गाण्यावर थिरकली चिमुकली; थेट श्रद्धा कपूरला दिली टक्कर, Viral Video पाहू नेटकऱ्यांनी केलं कौतुक