
आजच्या काळात कोणाला काही जाणून घ्यायचे असेल तर लोक एकमेकांना विचारण्याऐवजी थेट गुगलवर सर्च करतात. (Photo : Pexels)

इंटरनेटच्या मदतीने तुम्ही अगदी कमी वेळात खूप गोष्टी जाणून घेऊ शकता. (Photo : Pexels)

शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, ऑफिस, रिसर्च अशा अनेक कामांसाठी लोक गुगलचा वापर करतात. गुगलवर लहान मोठ्या गोष्टींची उत्तरे पटकन मिळतात. (Photo : Pexels)

आता गोष्टी खूप सोप्या झाल्या आहेत आणि प्रत्येकजण गुगलवर अवलंबून राहू लागला आहे. (Photo : Pexels)

पण, जर आपण गुगल वर सर्वकाही शोधू शकतो? यावर तुमचे उत्तर होय असेल, तर तुम्ही चुकीचे आहात. (Photo : Pexels)

अशा काही गोष्टी आहेत ज्यांना गुगलवर सर्च करण्यापासून प्रतिबंध करण्यात आला आहे. असे केल्यास तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते.

चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या गोष्टी गुगलवर सर्च करणे टाळावे. (Photo : Pexels)

चाइल्ड पोर्नोग्राफी : तुम्ही गुगलवर चाइल्ड पोर्नोग्राफी शोधात असाल आणि तुमचा आयपी अॅड्रेस सापडल्यास तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते.

आपल्या देशात चाइल्ड पॉर्न बनवणे किंवा पाहणे दोन्ही बेकायदेशीर आहे. त्यामुळे हे चुकूनही गुगलवर सर्च करू नका. (File Photo)

कोणत्याही चुकीच्या संघटनेबद्दल माहिती शोधणे : ज्या संस्था किंवा संघटना बॅन आहेत अशा संघटनेबद्दल गुगल वर सर्च करू नका. (Photo : Pexels)

‘आयएसआयएसमध्ये कसे सामील व्हावे’ आणि ‘विमानावर हल्ला कसा करायचा’ यासारख्या गोष्टी गुगलवर कधीही सर्च करू नका. हे तुम्हाला अडचणीत आणू शकते. (Photo : Pexels)

बॉम्ब बनवणे : गुगलवर बॉम्ब कसा बनवायचा हे सर्च करू नका. असे केल्यास तुम्ही सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर येऊ शकता. (Photo : Freepik)

गुगलवर असा सर्च केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते आणि तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे असे करू नका. (Photo : Freepik)

गर्भपात करणे : तुम्ही कधीही गुगलवर जाऊन गर्भपात कसा करायचा हे शोधू नये. बरेच लोक इथे ‘How to abort’ लिहून सर्च करतात, पण तुम्ही असे करू नये. (Photo : Pexels)

वास्तविक, या पद्धती तुम्हाला अडचणीत आणू शकतात. त्यामुळे ताबडतोब डॉक्टरांकडे जाणे चांगले. (Photo : Pexels)

शॉपिंग ऑफर्स : बरेच लोक त्यांचे पैसे वाचवण्यासाठी गुगलवर शॉपिंग ऑफर्स शोधतात. (Photo : Pexels)

परंतु हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की येथे अनेक फसवणूक करणाऱ्या वेबसाइट्स आहेत, ज्या तुम्हाला ऑफर्सचे आमिष दाखवतात. (Photo : Pexels)

आपण या आमिषांना बळी पडून या वेबसाइट्सवर क्लिक करतो. नंतर ते तुमचे बँक खाते रिकामे करतात. त्यामुळे गुगलवर हे सर्च करू नका.(Photo : Pexels)