-
बीएमडब्ल्यूने (BMW) भारतात आपल्या चार प्रीमियम बाईक लाँच केल्या आहेत.
-
आर १२५० आरटी (R 1250 RT), के १६०० बी (K 1600 B), के १६०० जीएलटी (K 1600 GTL) आणि के १६०० ग्रँड अमेरिका (K 1600 Grand America) अशी या बाईक्सची नावे आहेत.
-
फीचर्स आणि किंमत या दोन्ही बाबतीत या बाईक्स इतक्या जबरदस्त आहेत की सर्वांचेच होश उडाले आहेत.
-
R 1250 RT : आर १२५० आरटी बाईकबद्दल बोलायचे झाले तर यात १०.२५ इंच टीएफटी कलर डिस्प्ले आहे. यामध्ये नवीन फ्रंट एलईडी हेडलाइट्स बसवण्यात आले आहेत.
-
तसेच, यामध्ये वायरलेस चार्जिंग, साध्या ऑपरेशन्ससाठी बटणे, नेव्हिगेशनसाठी १०.२५ इंच टीएफटी स्क्रीन, आरामदायी प्रवासासाठी सक्रिय क्रूझ कंट्रोल, नवीन उत्कृष्ट ऑडिओ सिस्टम बसवण्यात आली आहे.
-
बीएमडब्ल्यूने के १६०० बी बाईकमध्ये साउंड एन्हांसिंग ऑडिओ सिस्टम २.० दिली आहे. या बाइकमध्ये सहा सिलेंडर इंजिन आहे.
-
लूकसाठी कंपनीने यात युनिक वॉटर ट्रान्सफर पेंटवर्क वापरले आहे. स्मार्टफोनच्या चार्जिंगसाठी यामध्ये स्टोरेज देण्यात आले आहे.
-
पायांच्या आरामासाठी आरामदायी फ्लोअरबोर्ड दिलेला आहे. तसेच, यामध्ये पॉवरफुल हेडलाइट्स देण्यात आले आहेत.
-
बीएमडब्ल्यूने आपल्या के १६०० जीएलटी बाईकमध्ये इंथ्रॅलिंग इंजिन दिले आहे. यात इंटिग्रेटेड स्मार्टफोन चार्जिंग कंपार्टमेंट आहे.
-
सुलभ ऑपरेशन्ससाठी बटणे प्रदान केली जातात. तसेच, उच्च दर्जाची ७१९ क्लासिक बनावट चाके देण्यात आली आहेत.
-
त्याचबरोबर कंपनीने १०.२५ इंचाचा टीएफटी डिस्प्ले दिला आहे आणि यामध्ये सामान ठेवण्यासाठी जागाही आहे.
-
पावरफुल एलईडी दिवे आणि आवाज वाढवणारी ऑडिओ सिस्टम २.० देण्यात आली आहे.
-
बीएमडब्ल्यूने के १६०० ग्रँड अमेरिका मध्ये उत्कृष्ट साऊंड असलेली ऑडिओ सिस्टीम, सहा सिलेंडर इंजिन, प्रॅक्टिकल टॉप केस, स्मार्टफोन चार्जिंग स्टोरेज कंपार्टमेंट आहे. तसेच कंपनीने याला वॉटर पेंटवर्क दिले आहे.
-
पावरफुल हेडलाइट्ससह १०.२५ इंचाचा टीएफटी डिस्प्ले दिला आहे
-
सर्व फोटो : bmwmotorcycles.com
IND vs AUS, Match Timings: भारत- ऑस्ट्रेलिया वनडे सामना किती वाजता सुरू होणार?