-
इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रील्स हे फिचर खूप प्रसिद्ध आहे. आपले रील्स व्हायरल व्हावेत यासाठी युजर्स वेगवेगळ्या कल्पना वापरून हटके रील्स बनवण्याचा प्रयत्न करत असतात.
-
रील्समधुन कमी वेळात जास्तीत जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला जातो. रील्समध्ये व्हिडीओच्या माध्यमातूम डान्स, गाणी, मिमक्री, एखाद्या चित्रपटातील सीन, कलाकारांचे वेगेवेगळे आर्ट फॉर्म असं बरचं काही शेअर करता येते.
-
काही वेळा आपल्याला हे रील्स फोन गॅलरीमध्ये सेव्ह करायचे असतात, जेणेकरुन नंतर आपल्याला ते पाहता किंवा वापरता येतील.
-
पण इन्स्टाग्रामवरील रील्स फोन गॅलरीमध्ये सेव्ह करण्याचा पर्याय उपलब्ध नाही. अशावेळी कोणत्या ट्रिक्स वापरून रील्स डाऊनलोड करता येतील जाणून घेऊया.
-
इंस्टाग्राम रिल्स डाउनलोड करण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याने त्यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी ॲप्सचा वापर करावा लागेल.
-
जर तुम्हाला थर्ड पार्टी ॲप्स चा वापर करायचा नसेल तर अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्ते स्क्रीन रेकॉर्डर वापरून रील रेकॉर्ड करू शकतात.
-
थर्ड पार्टी ॲप वापरण्यासाठी तुम्हाला स्मार्टफोनवर व्हिडीओ डाऊनलोडर फॉर इंस्टाग्राम (Video Downloader For Instagram) हे ॲप इन्स्टॉल करावे लागेल.
-
हे ॲप ओपन केल्यावर यामध्ये टॉप ॲप्स हा पर्याय दिसेल. त्यातील इन्स्टाग्राम पर्याय निवडुन इंस्टाग्राम अकाउंट लॉगिन करा.
-
जे रील डाऊनलोड करायचे आहे ते रील शोधा आणि त्याखाली दिलेल्या डाउनलोड पर्यायावर क्लिक करा.
-
आयफोनवर इंस्टाग्राम रील डाउनलोड करण्यासाठी इन्स्टंट सेव ॲप (Instant Save App) वापरावे लागेल.
-
हे ॲप इन्स्टॉल करून यामध्ये इंस्टाग्राम लॉगिन करा. त्यांनंतर जे रील डाउनलोड करायचे आहे त्याची लिंक कॉपी करून इन्स्टंट सेव्ह ॲपमध्ये पेस्ट करा.
-
तिथे सेव्ह पर्याय उपलब्ध होईल त्यावर क्लिक करून इन्स्टाग्राम रील डाउनलोड करा. अशाप्रकारे तुम्ही सहजरित्या अँड्रॉइड स्मार्टफोन किंवा आयफोनवर इन्स्टाग्राम रील डाउनलोड करु शकता. (सर्व फोटो सौजन्य : Freepik)

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक