-
टाटा मोटर्सच्या गाड्यांना ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून विक्रीची आकडेवारी पाहून आपण याचा अंदाज लावू शकतो.
-
दरम्यान, कंपनीने आता पुढील वर्षाची तयारी केली आहे. २०२३ मध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध करून देणार आहे.
-
या अंतर्गत, काही कारचे अद्ययावत मॉडेल ऑफर केले जातील, तर काही व्हेरिएंट्सचे इलेक्ट्रिक मॉडेल्स लॉंच करण्याची तयारीही सुरू आहे.
-
ग्लोब न्यूज इनसाइडरच्या अहवालानुसार, टाटा मोटर्स २०२३ मध्ये त्यांच्या मध्यम आकाराच्या एसयूव्ही हॅरियरचे अद्ययावत मॉडेल सादर करू शकते.
-
अशीही चर्चा आहे की कंपनी आपल्या ७ सीटर एसयूव्ही सफारीची अपडेटेड आवृत्ती लॉंच करण्याच्या तयारीत आहे.
-
अहवालानुसार, गेल्या काही महिन्यांत टाटाच्या हॅरियर फेसलिफ्ट आणि सफारी फेसलिफ्ट चाचणीचे स्पाय शॉट्सदेखील समोर आले आहेत.
-
यामध्ये असं म्हटलंय की पुढील वर्षी, हॅरियरमध्ये एडीएएस (Advanced Driver Assistance System) सह पेट्रोल इंजिन पर्याय दिसण्याची शक्यता आहे. तर, सफारीदेखील अनेक बदलांसह बाजारात येऊ शकते.
-
हॅरियर आणि सफारीच्या अद्ययावत मॉडेल्ससह, टाटा मोटर्स पुढील वर्षी इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये मोठी हालचाल करण्याच्या तयारीत आहे.
-
टाटा कंपनी पंच ईव्ही आणि अल्ट्रोझ ईव्ही २०२३ मध्ये सादर करू शकते, तसेच प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोझचे नवीन मॉडेल झीप्ट्रोन इलेक्ट्रिक तंत्रज्ञानासह येऊ शकते अशी अपेक्षा आहे.
-
याशिवाय, मिनी एसयूव्ही पंचचे इलेक्ट्रिक व्हर्जन नवीन आणि उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह सुसज्ज असेल.
-
एका मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी आपल्या ईव्ही मॉडेलमध्ये ३०.२ केडब्ल्यूएच लिथियम-आयन बॅटरी पॅक देऊ शकते. हे १२९बीएचपी पॉवर देण्यास सक्षम असेल. नवीन मॉडेलला ३००किमीपेक्षा जास्त इलेक्ट्रिक रेंज मिळण्याची शक्यता आहे.
-
या कार्स व्यतिरिक्त, २०२३ साठी ग्राहकांना देण्यात येणाऱ्या इतर पर्यायांमध्ये कंपनीने आपल्या नेक्सॉनचादेखील समावेश केला आहे.
-
अहवालानुसार, कंपनी आपली सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही नेक्सॉन नवीन अवतारात फॅक्टरी फिट सीएनजी किटसह देऊ शकते.
-
नेक्सॉन सीएनजी १.२ली ३ सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिनसह फॅक्टरी फिट सीएनजी किटद्वारे समर्थित असण्याची शक्यता आहे.
-
असे म्हणता येईल की टाटा मोटर्ससाठी पुढील वर्षदेखील खूप चांगले जाणार आहे आणि कंपनीच्या ग्राहकांना अनेक उत्तम पर्यायदेखील मिळणार आहेत.
-
रविवारी पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, टाटा मोटर्स त्यांच्या इलेक्ट्रिक एसयूव्ही वाहनांमध्ये फोर व्हील ड्राइव्ह तंत्रज्ञान सादर करण्याचा विचार करत आहे. ही वाहने कंपनीच्या नेक्सॉनच्या वरच्या श्रेणीतील असतील.
-
कंपनीने २०२५ पर्यंत १० इलेक्ट्रिक वाहनांचा पोर्टफोलिओ तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये केवळ विद्यमानच नव्हे तर नवीन मॉडेल्सचाही समावेश असेल.
-
टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक (प्रवासी वाहन आणि इलेक्ट्रिक वाहने) शैलेश चंद्र यांनी म्हटले आहे की आम्ही इलेक्ट्रिक वाहनांमध्ये फोर व्हील ड्राइव्ह तंत्रज्ञान देण्यावर भर देणार असून आम्ही यावर काम करणार आहोत. (सर्व फोटो : tatamotors.com)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”