-
दिवसभरात अनेक कामांसाठी आपण मोबाईलवर अवलंबून असतो. त्यामुळे मोबाईलची बॅटरी लगेच संपण्याची शक्यता असते.
-
त्यामुळे मग सतत फोनला चार्ज करावे लागते. पण बाहेर असताना सतत चार्ज कारणे शक्य नसते. मग अशावेळी पॉवर बँक किंवा उपलब्ध चार्जरचा वापर केला जातो.
-
पण वेगळ्या फोनचे चार्जर वपारल्याने बॅटरी खराब होण्याची तसेच फोनचा ब्लास्ट होण्याची शक्यता असते. तर पॉवर बँक घेण्यासाठी एक्स्ट्रा खर्च करावा लागतो.
-
चार्जिंगच्या समस्येवर पॉवर बँकवर खर्च न करता काही ट्रिक्स वापरून उपाय मिळवू शकता. काय आहेत या ट्रिक्स जाणून घ्या.
-
मोबाईलचा ब्राईटनेस कमी ठेवल्याने बॅटरी लवकर संपत नाही.
-
गरज नसल्यास स्पीकरचा आवाज कमी ठेवा. जेव्हा गरज असेल तेव्हा वाढवा. असे केल्याने बॅटरी लवकर संपणार नाही.
-
फोनच्या प्रोसेसरवर दबाव असेल तर बॅटरी लवकर संपु शकते. यासाठी फोनमध्ये असणारे हेवी गेम्स अनइन्स्टॉल करा.
-
फोन चार्ज करण्यासाठी फोनबरोबर मिळालेलाच चार्जर वापरा. इतर कंपनीचा किंवा डुब्लीकेट चार्जर वापरल्यास फोनची बॅटरी खराब होऊ शकते, ज्यामुळे चार्जर लगेच संपते.
-
गरज नसलेल्या फाइल्स फोनमधून डिलीट करा कारण यामुळे प्रोसेसरवर दबाव पडतो. त्यामुळे बॅटरी लगेच संपण्याची शक्यता असते. (फोटो सौजन्य : Pexels)

IND vs ENG: ड्रीम विकेट! आकाशदीपने रूटला केलं क्लीन बोल्ड; ‘तो’ बॉल पाहून सगळेच चकित, गिलने डोक्याला लावला हात; VIDEO व्हायरल