-
ट्रायने गेल्या महिन्यात सर्व टेलिकॉम कंपन्यांना किमान ३० दिवसांची मुदत असलेले रिचार्ज प्लॅन सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
-
बीएसएनएलने जीओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाला टक्कर देण्यासाठी दोन नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत.
-
या रिचार्ज प्लॅनची किंमत २६९ आणि ७६९ रुपये आहे.
-
हे दोन्ही रिचार्ज २८ दिवसांपेक्षा जास्त वैधतेसह दररोज अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस ऑफर करतात.
-
यासोबतच प्लॅनमध्ये सुपरफास्ट डेटाही दिला जातो.
-
बीएसएनएलने या प्लॅनला STV२६९ प्लॅन असे नाव दिले आहे. यामध्ये १०० एसएमएस सह दररोज २ जीबी डेटा मिळत यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे.
-
याशिवाय प्लॅनमध्ये BSNL Tunes, Challenges Arena गेम्स, Eros Now Entertainment, Lystn Podcast, Hardy Mobile Game, Lokdhun आणि Zing ची मेंबरशीप देखील समाविष्ट आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी ३० दिवसांची आहे.
-
तर बीएसएनएलच्या दुसऱ्या प्लॅनचे नाव STV७६९ आहे. यामध्ये दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळतात. याशिवाय या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे.
-
याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्हाला BSNL Tunes, Challenges Arena गेम्स, Eros Now Entertainment, Lystn Podcast, Hardy Mobile Game, Lokdhun आणि Zing चे फ्री अॅक्सेस मिळते. या रिचार्ज प्लॅनची मुदत ९० दिवस आहे.
-
बीएसएनएलच्या २६९ च्या रिचार्ज प्लॅनची टक्कर जीओच्या २९९ रुपयांच्या रिचार्ज पॅकशी असेल.
-
या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस दिला जातो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.
-
सरकारी टेलिकॉम ऑपरेटरने लॉन्च केलेले दोन्ही प्लॅन प्रीपेड सिमवर उपलब्ध आहेत. (फोटो सौजन्य : pixabay)

MI vs GT Highlights: अखेरच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सने गमावला सामना, गुजरात ठरली टेबल टॉपर