-
सुंदर पिचाई : हे सध्या अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ आहेत. तामिळनाडूतील मदुराई येथे जन्मलेल्या पिचाई यांनी आयआयटी खरगपूरमधून इंजिनिअरिंगमध्ये पदवी केली. २०१५ मध्ये पिचाई गुगलचे सीईओ बनले. त्यानंतर २०१९ मध्ये ते अल्फाबेटचे सीईओ झाले. (Photo: Indian Express)
-
सत्या नडेला : तेलंगणातील हैदराबाद येथे जन्मलेल्या सत्या नडेला यांनी कर्नाटकातील मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. ते सध्या मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि सीईओ आहेत. (Photo: Indian Express)
-
नील मोहन (CEO, YouTube) : नील मोहन सध्या यूट्यूबचे सीईओ आहेत. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. ते भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत. (Photo: Neal Mohan/FB)
-
शंतनू नारायण : यांचा जन्म हैदराबादमध्ये एका तेलुगू हिंदू कुटुंबात झाला. त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलं. ते सध्या अॅडोबचे सीईओ आहेत. (Photo: Indian Express)
-
अरविंद कृष्णा : हे आयबीएमचे अध्यक्ष आणि सीईओ आहेत. त्यांनी आयबीएममध्ये एआय, क्लाउड आणि क्वांटम कॉम्प्युटिंग प्रकल्पांवर काम केलं आहे. कृष्णा यांनी आयआयटी कानपूरमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील एका तेलुगू कुटुंबात झाला. (Photo: Indian Express)
-
सलील पारेख : सलील पारेख यांनी इन्फोसिसची पोहोच जागतिक ग्राहकांपर्यंत आणि डिजिटल तंत्रज्ञानापर्यंत वाढवली. ते सध्या कंपनीचे सीईओ आणि एमडी म्हणून काम करतात. त्यांनी आयआयटी मुंबईमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली.(Photo: Infosys/Insta)
-
संजय मेहरोत्रा : हे मायक्रोन टेक्नॉलॉजीचे सीईओ आहेत. त्यांनी मेमरी आणि डेटा स्टोरेजमध्ये मायक्रोन टेक्नॉलॉजीची ओळख प्रस्थापित केली. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे जन्मलेले संजय मेहरोत्रा यांनी बिट्स पिलानी येथे शिक्षण घेतलं. नंतर त्यांची बदली कॅलिफोर्निया विद्यापीठात झाली. (Photo: Indian Express)
-
रवी कुमार एस : हे आयटी आणि डिजिटल सेवांमध्ये आघाडीवर असलेल्या कॉग्निझंटचे सीईओ आहेत. ओडिशामध्ये जन्मलेल्या रवी कुमार एस यांनी महाराष्ट्रातील शिवाजी विद्यापीठातून अभियांत्रिकी आणि भुवनेश्वरच्या झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. (Photo: Ravi Kumar S/FB)
-
लीना नायर : लीना नायर यांचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे झाला. त्या सध्या प्रसिद्ध लक्झरी फॅशन ब्रँड चॅनेलच्या सीईओ आहेत. त्या चॅनेलच्या पहिल्या भारतीय वंशाच्या सीईओ बनल्या आहेत. (Photo: Leena Nair/FB)
-
जॉर्ज कुरियन : हे केरळचे आहेत. ते गुगल क्लाउडचे सीईओ थॉमस कुरियन यांचे भाऊ आहेत. ते सध्या नेटअॅपचे सीईओ आहेत. त्यांनी स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून पदवी प्राप्त केली. (Photo: Life At NetApp/FB)

प्रत्येकाचा हिशोब उघडणार! साडेसाती असलेल्या ‘या’ लोकांची शनी महाराज नोव्हेंबरपासून खरी परीक्षा घेणार? कुणाच्या नशिबातील सुख हरपणार?