-
औरंगाबादमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोन गटात वाद झाला.
-
वादाचे पडसाद काही वेळाने गांधीनगर, मोती कारंजा, रोजा बाग या परिसरात उमटले.
-
दगडफेकीत २५ हून अधिक जखमी झाले असून यात परिसरातील अनेक दुकानांचे नुकसान झाले आहे.
-
जमावाने चार चाकी वाहनांचे नुकसान केले.
-
दुचाकीही पेटवण्यात आल्या.
-
वाद नेमका कशावरुन झाला हे समजू शकलेले नाही.
-
जखमींमध्ये पोलिसांचाही समावेश आहे.
-
तणावामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
-
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Photos: गौतमी पाटीलचे घर पाहिलेत का? दिवाळीनिमित्त शेअर केलेल्या फोटोंमधून दाखवली झलक