-
मान्सूनला सध्या हवीतशी सुरुवात झालेली नसली तरीही मायानगरी मुंबईवर बरसणाऱ्या हलक्या पावसाच्या सरींनी वातावरणात वेगळाच उत्साह आणला आहे. पावसाळ्यात मुंबईकरांची पावलं आपोआपच या शहराला लाभलेल्या अफाट अशा समुद्रकिनाऱ्याकडे वळतात. मरिन लाइन्स, वरळी सी फेस, बँडस्टँड, माहिम, शिवाजी पार्क अशा विविध ठिकाणी मुंबईकर आणि मुंबईत येणाऱ्या पर्यटकांची गर्दी असते. आपल्या आनंदासाठी, मौजमजेसाठी या समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या असंख्य जनसमुदायापैकी फार क्वचितच लोकांचं लक्ष या समुद्राच्या पोटात आणि किनाऱ्यालगत असणाऱ्या कचऱ्याकडे जातं. खरंतर ही परिस्थिती मनाला चटका लावून जाते, कारण निसर्गाने आपल्याला जे देणं दिलं आहे, त्याची आपण अक्षरश: नासधूस करत आहोत. (छाया सौजन्य- Mahim Beach Clean Up)
-
हीच वाताहात टाळण्यासाठी आपल्या वतीने खारीचा वाटा उचलत रबिता तिवारी आणि इंद्रनील सेनगुप्ता यांनी एक महत्त्वाची मोहिम सुरु केली. (छाया सौजन्य- Mahim Beach Clean Up)
-
आठवडाअखेर सहसा मुंबईबाहेर जात निवांत क्षण व्यतीत करण्यापेक्षा त्यांनी प्राथमिक स्तरावर माहिमच्या समुद्रकिनाऱ्यावर येत स्वच्छता मोहिम सुरु केली. ज्यामध्ये त्यांना तरुणाईची चांगलीच साथ लाभली. (छाया सौजन्य- Mahim Beach Clean Up)
-
आतापर्यंत जवळपास ३६ आठवड्यांमध्ये त्यांनी ५०० टन कचरा माहिम समुद्रकिनारपट्टीवरुन उचलला असून, अजूनही त्यांची ही मोहिम सुरुच आहे. (छाया सौजन्य- Mahim Beach Clean Up)
-
नुकतंच वंडरिंग सोल्स wandering souls या तरुणांच्या ग्रुपनेही या अनोख्या आणइ पर्यावरणस्नेही उपक्रमात सहभागी होत मुंबईच्या किमनपट्टीच्या स्वच्छतेसाठी आपलं योगदान दिलं. (छाया सौजन्य- Mahim Beach Clean Up)
-
यावेळी प्रत्येकाच्या मनात आपल्या शहराप्रती असणारं प्रेम तर होतंच. पण, त्यासोबतच निसर्गाची होणारी हानी पाहून त्यांच्या मनात असंख्य प्रश्नांनी घर केलं होतं हेसुद्धा तितकच खरं. (छाया सौजन्य- Mahim Beach Clean Up)
-
कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही स्वत:पासूनच करावी असं म्हणतात ते अगदी खरंच आहे, हेच इंद्रनील, रबिता आणि त्यांना साथ देणाऱ्या प्रत्येकाच्या कृतीतून स्पष्ट होत आहे. (छाया सौजन्य- Mahim Beach Clean Up)
-
(छाया सौजन्य- Mahim Beach Clean Up)
-
(छाया सौजन्य- Mahim Beach Clean Up)

Ahmedabad Plane Crash: इंग्रजी न समजल्यामुळे २९ वर्षांपूर्वी झाला होता विमानाचा भीषण अपघात; ३४९ बळी घेणारी ती घटना नेमकी कोणती?