-
पुराचा तडाखा बसलेल्या केरळ राज्यात सध्या प्रत्येकजण आपआपल्या परिने परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्य म्हणजे हा माहोल 'ओणम' या सणाचा आनंदपर्व साजरा करण्याचा आहे. पण, निसर्गाने जो काही आघात या देवभूमीवर केला, तो पाहता ओणमचा उत्साह कुठेतरी कमी झालेला दिसला. असं असलं तरीही पूरग्रस्तांच्या आनंदासाठी, त्यांच्या चेहऱ्यावर काही क्षणांसाठी का असेना पण हसू खुलवण्यासाठी केरळातील सेंट अँथनी मदत छावणीमध्ये ओणम साजरा केला गेला. (छाया सौजन्य- Nirmal Harindran)
-
कोट्टायम जिल्ह्यातील वेचूर गावी शुक्रवारी हा सण साजरा झाला. (छाया सौजन्य- Vignesh Krishnamoorthy)
-
केरळमध्ये आता कुठे जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य- Nirmal Harindran)
-
जनसामान्य पूराच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असले, तरीही केरळातील बाजारपेठांमध्ये मात्र शुकशुकाटच आहे. (छाया सौजन्य- Nirmal Harindran)
-
अलुवा ही येथील सर्वात गजबजलेली बाजारपेठ आहे. पेरियार नदीच्या किनारी असणाऱ्या या बाजारपेठेच्या परिसरालाही पूराचा तडाखा बसला होता. (छाया सौजन्य- Nirmal Harindran)
-
जवळपास १० हजार लोकांची वसती असणाऱ्या या भागातील स्थानिकांना विविध ठिकाणी असणाऱ्या ७८ मदत छावण्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं होतं. (छाया सौजन्य- Nirmal Harindran)
-
सध्याच्या घडीला लहानमोठ्या गोष्टीमध्ये आनंद शोधणाऱ्या केरळवासियांना आर्थिक मदतीसोबतच आधाराची गरजही आहे हे नाकारता येणार नाही. (छाया सौजन्य- Nirmal Harindran)

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”