मुंबई, चेन्नई, बेंगळुरु आणि दिल्ली अशा शहरांमध्ये घर किंवा दुकान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. देशातील सर्वात मोठी बँक अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाने ही संधी उपलब्ध करुन दिलीये. -
एसबीआय बँकेकडून कर्ज वसुलीसाठी जप्त केलेल्या कर्जबुडव्यांच्या घरांचा (प्रॉपर्टी) लिलाव करण्यात येणार आहे. जाणून घेऊया कधी आहे हा लिलाव आणि या लिलाव प्रक्रियेत कसं सहभागी व्हायचं याबाबतची सर्व माहिती –
-
स्टेट बँक ऑफ इंडिया डिफॉल्टर्सच्या म्हणजेच कर्ज न फेडणाऱ्यांच्या निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेचा लिलाव करणार आहे. या मालमत्तेची किंमत रिअल इस्टेट बाजारभावातील किंमतीच्या तुलनेत कमी असण्याची शक्यता आहे.
-
एसबीआयने कोर्टाच्या आदेशानंतरच या संपत्तीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतलाय. कोर्टाच्या आदेशानंतर लिलाव होत असल्यामुळे प्रॉपर्टीची वैधता किंवा मालकी हक्काबाबत तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाहीये. तर जाणून घेऊया कधी आहे हा लिलाव
-
डिफॉल्टर्स म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ज्यांनी वेळेवर बँकेचं कर्ज फेडलं नाही अशा व्यक्तींच्या संपत्तीचा कर्ज वसुलीसाठी लिलाव केला जातो. हा लिलाव 26 फेब्रुवारी, 2020 रोजी होईल. लिलावासाठी अर्ज कसा करायचा –
-
२६ फेब्रुवारी रोजी हा लिलाव होणार असल्याने अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे १० दिवसांहून कमी दिवस उरले आहेत. SBI कडून ट्विटरद्वारे या लिलावाबाबत माहिती दिलीये. लिलावाआधी बँकेकडून वर्तमानपत्र आणि अन्य जाहिरातींद्वारे लोकांना याबाबत माहिती दिली जाते.
या लिलावात सहभागी होण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करु शकतात. ऑनलाइन संकेतस्थळावर बँकेकडून काही आवश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. कोणती आहेत ही कागदपत्र… आवश्यक कागदपत्रांमध्ये डिजिटल स्वाक्षरीसोबत केवायसी कागदपत्रांचा समावेश आहे. तसेच, EMD म्हणजे अर्नेस्ट मनी डिपॉजिट करावे लागतील. जवळच्या शाखेमध्ये जाऊन किंवा ऑनलाइन तुम्हाला ही कागदपत्रे भरावी लागतील त्यानंतर तुम्ही या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. ऑनलाइन या लिलावाविषयी सविस्तार माहिती… -
लिलावाविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी https://bank.sbi/web/sbi-in-the-news/auction-notices/mega-e-auction या लिंकवर क्लिक करु शकतात. याशिवाय…
अधिक माहितीसाठी SBI ने अजून तीन लिंक शेअर केल्या आहेत. – https://www.bankeauctions.com/Sbi – या लिंकवर लिलावाबात अधिक माहिती उपलब्ध आहे. याशिवाय… याशिवाय, एसबीआयने https://sbi.auctiontiger.net/EPROC/ – https://ibapi.in – लिलावाच्या माहितीसाठी ही दुसरी लिंक उपलब्ध केली आहे. तसेच… -
लिलावात सहभागी होणाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बँकेने https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp ही तिसरी लिंकही शेअर केली आहे.
-
SBI ने उपलब्ध केलेल्या या संधीमुळे तुम्ही स्वस्तात घर किंवा दुकान खरेदी करु शकतात आणि बऱ्याच पैशांची बचत करु शकतात.
-
मुंबई, चेन्नई, बेंगळुरु आणि दिल्ली या शहरांमधील प्रॉपर्टीसाठी २६ तारखेचा लिलाव होणार आहे.

Donald Trump : ‘तर पुन्हा १९२९ सारखी महामंदी येईल’; ट्रम्प यांचा टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकन न्यायालयांना इशारा