-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प भारतात पोहोचण्याआधी त्यांच्या सुरक्षा आणि स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे. या दरम्यान अमेरिकन एअर फोर्सचे हरक्युलिस हे स्पेशल विमान, स्नायपर्ससह अहमदाबादमध्ये दाखल झाले आहे.
-
या हरक्युलिस विमानामध्ये ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणारी सर्व स्पेशल वाहने आहेत. ट्रम्प यांच्या ताफ्यातील गाडया, फायर सेफ्टी सिस्टिम आणि स्पाय कॅमेऱ्याचा समावेश आहे.
-
ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी खास अमेरिकेहून आलेले २०० सीआयए एजंट तैनात असतील. अहमदाबाद पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांबरोबर ते समन्वय साधतील.
-
एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाला खास निर्देश देण्यात येणार आहेत. ट्रम्प यांच्या विमानाच्या लँडिंगआधी अहमदाबाद एअरपोर्टवरील सर्व विमानांचे लँडिंग तीन तासाठी बंद राहील.
-
एअर पोर्टपासून ट्रम्प यांचा रोड शो सुरु होईल. या दरम्यान चिट-पाखरुही फिरकणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे. रोड शो च्या आधी बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण रोड शो च्या मार्गाने स्कॅनिंग करण्यात येईल.
-
ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने वाहतूक व्यवस्थापनापासून हवाई सुरक्षेपर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जात आहे. रोड शो मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाईल. ही जबाबदारी स्थानिक पोलिसांवर सोपवण्यात येईल.
-
ट्रम्प यांच्या हवाई सुरक्षेमध्ये सात विमानांचा ताफा असेल. अमेरिकन एअर फोर्स वन शिवाय आणखी सहा विमाने असतील.
-
ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी १० हजार पोलीस तैनात असतील. यामध्ये २५ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
-
गुजरातमधल्या या स्टेडियमचं उद्घाटन अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते होणार आहे.
-
संग्रहित छायाचित्र

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…