-
सगळ्या देशाच्या नजरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याकडं असताना राजधानी दिल्लीत सोमवारी हिंसाचाराचा उद्रेक झाला. ईशान्य दिल्लीतील जाफराबाद मेट्रो स्टेशन परिसरात सीएए विरोधक आणि समर्थक गट भिडले. यावेळी दोन्ही बाजूंनी तुफान दगडफेक करण्यात आली. (Photo : Somya Lakhani,Amit Mehra/Indian Express)
-
दोन्ही गटातील काही आंदोलकांनी जाफराबाद मौजपूरी परिसरातील अनेक वाहनं आंदोलकांनी पेटवून दिली. जमाव आक्रमक झाल्यानं पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
-
दुर्दैवानं या दगडफेकीत एका पोलीस कर्मचाऱ्यांसह दोघांचा मृत्यू झाला. पोलीस कर्मचाऱ्यांसह ३७ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.
-
-
दगडफेकीत जखमी झालेल्यांना जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
-
तणावामुळे दिल्ली मेट्रो प्रशासनानं जाफराबाद, मौजपुरी बाबरपूर, गोकुळपूरी, जोहरी एनक्लेव्ह, शिव विहार, उद्योग भवन, पटेल चौक, केंद्रीय सचिवालय, जनपथ आदी स्टेशन बंद केली आहेत. या स्थानकांवरील मेट्रोचे थांबेही रद्द करण्यात आले आहेत.
-
दोन्ही गटात झालेल्या धुमश्चक्रीनंतर जाफराबाद मौजपुरी रस्त्यांवर दगडाचा खच पडला होता.
-
तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जमाव बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
-
दगडफेकीच्या घटनेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि उपराज्यपाल अनिल बैजल यांनी शांतता राखण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.
-
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्यावर हल्ला करणाऱ्यांचा निषेध केला आहे.
संकष्टी चतुर्थीला १२ राशी होणार संकटमुक्त; पदरी पडेल कल्पनेपलीकडील यश-लाभ; वाचा तुमचे राशिभविष्य