-
मेलानिया ट्रम्प यांनी दिल्लीतील नानकपुरा येथील सर्वोदय सेकंडरी स्कूलला भेट दिली
-
विद्यार्थीनींनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले.
-
यावेळी त्यांना पारंपारिक पद्धतीने गंध देखील लावण्यात आला.
-
तसेच, सुंदर पुष्पगुच्छ देण्यात आला. या स्वागतामुळे त्या अधिकच आनंदी झाल्या.
-
विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या स्वागताने त्या भारावून गेल्या होत्या.
-
नंतर त्यांनी हॅपीनेस क्लासची पाहणी केली.
-
वर्गातील विद्यार्थी पाहून त्या अतिशय आनंदी दिसत होत्या.
-
शाळेतील शिक्षिकांनी त्यांना यावेळी माहिती दिली.
-
सुंदर सजावट केलेल्या वर्गाची त्या पाहणी करत होत्या.
-
यावेळी शिक्षिकांनी वर्गातील उपक्रमांचं सादरीकरण केलं.
-
विद्यार्थी खेळातून कसं शिकतात हे मेलेनिया यांनी पाहिलं.
-
विद्यार्थी देखील खेळात रममाण झाले होते.
-
मेलेनिया यांच्या स्वागतासाठी फळ्यावर संदेश लिहिण्यात आला होता.
-
मेलिनिया येणार म्हणून शाळेसह वर्गखोल्यांची सुंदर सजावट केली गेली होती.
-
मेलेनिया यांनी देखील कुतुहलाने विद्यार्थ्यांचे निरीक्षण केलं.
-
यावेळी त्यांनी मुलांशी संवाद देखील साधण्याचा प्रयत्न केला.
-
विद्यार्थी करत असलेल्या उप्रकमात त्या देखील सहभागी झाल्या.
-
मुलांच्या बरोबरीने त्यांनी खेळाची मजा घेतली.
-
मेलेनियासाठी मुलांनी भेटवस्तू देखील तयार केली होती.
-
मेलेनिया यांनी दाखवलेल्या प्रेमामुळे मुलं देखील आनंदी झाली होती.
-
मेलेनिया यांच्याबरोबर वर्गातील मुलांनी देखील आनंद लुटला.
-
विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात मेलेनिया यांनी शिक्षिकांनी मदत केली.
-
पारंपारिक वेशभुषेतील मुलींनी मेलेनिया यांचे पुष्पहार घालुन स्वागत केलं.
-
यानंतर त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नेण्यात आलं.
-
शाळेतील विद्यार्थीनींनी मेलेनिया यांच्यासमोर बहारदार नृत्य सादर केलं.
-
हे नृत्य पाहताना मेलेनिया रमल्याचे दिसून आलं.
-
या सांस्कृतिक कार्यक्रमाचा मेलेनिया यांच्याबरोबर विद्यार्थ्यांनी देखील आनंद लुटला.
-
शाळेकडून करण्यात आलेल्या स्वागतामुळे आनंदी झालेल्या मेलेनिया यांनी यावेळी मनोगत देखील व्यक्त केलं.
-
मेलेनिया यांना शाळेकडून भेट देखील देण्यात आली.
-
विशेष म्हणजे मेलेनिया यांनी एका विद्यार्थीनीस आनंदाने मिठी मारून आपल्या भावना व्यक्त केल्या.
-
शाळेतून निघताना त्यांनी विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन केलं.
-
अखेरीस हा आनंद मनात साठवून त्या शाळेतून पुढील नियोजित स्थळाकडे निघाल्या.
संकष्टी चतुर्थीला १२ राशी होणार संकटमुक्त; पदरी पडेल कल्पनेपलीकडील यश-लाभ; वाचा तुमचे राशिभविष्य