-
शिक्षण घेताना फी भरायलाही पैसे नव्हते, आई दुसऱ्याची घरी कामाला जायची. अशा बिकट परिस्थितीत अभ्यास करत तरूणानं पहिल्याच प्रयत्नात युपीएसीच्या परिक्षेत झेंडा रोवला. हा आयपीएस होणारा भारतातील सर्वात कमी वयाचा तरूण आहे. या तरूणाचा संघर्ष आणि त्याची सक्सेस स्टोरी आपण आज पाहणार आहोत…
साफिन हसन असं त्या तरूण आणि तडफदार आयपीएस आधिकाऱ्याचं नाव आहे. हसन मुळचा गुजरातचा आहे. यूपीएससीमध्ये ५७० वी रँक मिळवून अवघ्या 22 व्या वर्षी आयपीएस आधिकार बनला. हसनने अनेक अडचणींवर मात करत आपलं लक्ष्य प्राप्त केलं. -
आयपीएसच्या ट्रेनिंगनंतर जामनगर येथे त्याची पहिल्यांदा पोस्टिंग झाली. हसन युपीएससीची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उतीर्ण झाला.
-
युपीएसीच्या चौथ्या पेपरआधी हसनचा अपघात झाला होता. ८.३०च्या दरम्यान त्याच्या मोटरसायकला अपघात झाला.
-
हसनच्या गुडघ्याला, हाताला आणि डोक्याला मार लागला होता. तरीही कशाचीही परवा न करता हसनने पेपर दिला आणि आपलं ध्येय पूर्ण केलं.
-
हसन शाळेत शिकत असताना जिल्हाधिकाऱ्यानं त्यांच्या शाळेला भेट दिली होती. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यानं दिलेल्या भाषणापासून प्रेरित होत हसनने मोठं आधिकारी होण्याचं ठरवलं होतं.
-
साफिन लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. पण घरची परिस्थिती जिकारीची होती.
हसनने कधीकधी शाळेतील फी भरायलाही पैसे नसायचं. -
हसनच्या आई-बाबांनी २००० मध्ये घर बांधायला सुरूवात केली. मात्र पुरेशे पैसे नसल्यामुळे आई-बाबा दिवसा कामाला जायचे आणि रात्री घर बांधायचे. आई-बाबांचे कष्ट पाहून हसनला राहवले नाही. आणि एक दिवस मी आई-बाबांच्या कष्टाचं चिज करेल असं तो म्हणायचा..
घर चालण्यासाठी हसनचे वडील इलेक्ट्रीशियनचे काम करत होते. तर आई इतरांच्या घरातील कामं करत होती. -
आई वडिलांचा या कष्टाची जाण ठेवून हसनने अभ्यास केला.
-
हसनला सरकारी नोकरी मिळाल्याचं समजताच आई-बाबांच्या डोळ्यातील आश्रू अनावर झाले होते.
-
आज हसन देशातील सर्वात तरूण आयपीएस आधिकारी आहे. पालकांच्या काबाड कष्टाचं पोरानं चीज केलं असं , घराच्या आसपासते लोक म्हणत आहेत.
हसनला आज प्रत्येक ठिकाणी भाषण द्यायला तसेच मार्गदर्शन करायला बोलवलं जात आहे…हसन म्हणतो..आयुष्यात कितीही मोठा झालो तरी आई-बाबांच्या कष्टाला विसरणार नाही… (सर्व छायाचित्र – instagram/safinhasan )

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक