ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल भारताचा जावई होणार आहे. बुधवारी भारतीय वंशाची तरूणी विनी रमनसोबत मॅक्सवेलने साखरपुडा केला आहे. त्यामुळे मॅक्सवेल आता भारताचा जावई होणार आहे. मॅक्सवेलला क्लीन बोल्ड करणारी ही विनी रमन आहे तरी कोण, हे पाहूयात… -
मॅक्सवेल आणि विनी रमन मागील दोन वर्षांपासून एकमेंकाच्या प्रेमात आकंठ बुडाली आहेत. अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
लवकरच हे लव्ह बर्ड लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सेलिब्रेटी विनी रमनचा जन्म ३ मार्च १९९३ रोजी मेलबर्नमध्ये झाला. विनी रमनची रास मीन आहे. विनी रमन मूळची दाक्षिण भारताची आहे. तिचे आई-बाबा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात गेले. विनी रमनने मेडिकलमधून शिक्षण घेतलं असून ती पेशानं फार्मासिस्ट ( pharmacist ) आहे. विनीला गोल्फ आणि स्नूकर खेळायला आवडते. तर मार्गरिटा पिज्जा तिचा फेवरेट आहे. विनी रमनला एक बहिण असून मेलबर्नमध्ये ती नर्स म्हणून काम करत आहे. विनीचा आवडता रंग पिंक असून ती कॉफीची चाहतीची आहे. विनीला फिरायला आणि पोहायला आवडते. -
एका कार्यक्रमादरम्यान विनी आणि मॅक्सवेलची भेट झाली होती. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली.
दोघांच्याही भेटी वाढल्या आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. विनी रमनने आपल्या इन्स्टाग्राम मॅक्सवेलसोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. २६ वर्षीय विनी रमन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही मॅक्सवेलचं अभिनंदन केलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं आपल्या अधिकृत खात्यावरून दोघांचा फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. -
मॅक्सवेल भारताचा दुसरा जावई होणार आहे. याआधी २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटने भारतीय तरूणी मासूम सिंघासोबत लग्न केले आहे.
मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे मॅक्सवेलने क्रिकेटमधून अनिश्चीत काळासाठी विश्रांती घेतली होती. या आजारातून विनीनं मॅक्सवेलला बाहेर काढले होते. याचा खुलासा मॅक्सवेलने एका मुलाखतीत केला होता. -
आता हे दोघे साखरपुड्यानंतर लग्न कधी करणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

“…तर चीन उद्ध्वस्त होईल”, ट्रम्प यांचा इशारा; हुकुमाचे पत्ते असल्याचा दावा, भारताबरोबरची जवळीक खुपली?