-
आज मराठी भाषा दिन आहे. जगभरातील मराठी बांधवांकडून मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाते. जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या मराठी भाषा मंडळांमार्फत कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं. मात्र जागतिक स्तरावर सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीमध्ये मराठी कितव्या स्थानी आहे तुम्हाला विचारल्यास सांगता येईल का? नाही ना… हेच आज आम्ही तुम्हाला मराठी भाषा दिनानिमित्त सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात जगभरात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा कोणत्या आहेत ते.
-
अमेरिकेतील एथनोलॉग (Ethnologue) या एसआयएल इंटरनॅशनल मार्फत प्रसिद्ध होणाऱ्या अहवालामध्ये जगभरात सर्वाधिक लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या भाषांची यादी २०१९ साली तयार करण्यात आली होती. सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा म्हणजेच प्राथमिक भाषा असं या अहवालात म्हटलं असल्याने खालील आकडेवारी ही पहिला भाषा अर्थात मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येच्या आधारावर तयार करण्यात आली आहे.
-
उर्दू (Urdu Persianised Hindustani) – सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीमध्ये उर्दू २० व्या स्थानी आहे. जगभरात ६ कोटी ८६ लाख लोकं उर्दू भाषा बोलतात. भारत आणि पाकिस्तानमध्ये या भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा आहे. जगातील एकूण लोकसंख्येच्या ०.८९१ टक्के लोक उर्दू भाषा बोलतात.
-
यू चायनीज (Yue Chinese) – यू चायनीज ही सर्वाधिक बोलली जाणारी १९ वी भाषा आहे. जगभरामध्ये ७ कोटी ३१ लाख लोकं ही भाषा बोलतात. मुख्यपणे हाँगकाँग आणि मकाऊमध्ये ही भाषा बोलली जाते. जागतिक लोकसंख्येच्या ०.९४९ टक्के लोकं ही भाषा बोलतात.
-
तामिळ (Tamil) – तामिळ ही जगभरात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत १८ व्या स्थानी आहे. प्रामुख्याने श्रीलंका आणि भारतात बोलली जाणारी ही भाषा ७ कोटी ५० लाख लोक बोलतात. एकूण जागतिक लोकसंख्येच्या ०.९७४ टक्के लोकं तामिळ भाषा बोलतात.
-
व्हिएनामीज (Vietnamese) – व्हिएतनाम आणि चेक प्रजासत्ताकमध्ये ही भाषा बोलली जाते. ही सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीमध्ये १७ व्या स्थानी आहे. ७ कोटी ६० लाख लोकं ही भाषा बोलतात. जगातील ०.९८७ टक्के लोकं ही भाषा बोलतात.
-
जर्मन (German) – देशातील सर्वात प्रगत देशांपैकी एक असणाऱ्या जर्मनीची ही अधिकृत भाषा आहे. जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत जर्मन भाषा १६ व्या स्थानी आहे. ७ कोटी ६१ लाख लोकं ही भाषा बोलतात. जर्मन बोलणाऱ्यांची संख्या जागतिक लोकसंख्येच्या ०.९८८ टक्के इतकी आहे.
-
फ्रेन्च (French) – जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत १५ व्या स्थानी असणारी फ्रेन्च भाषा ७ कोटी ७२ लाख लोकं बोलतात. ही आकडेवारी एकूण जागतिक लोकसंख्येच्या १.००३ टक्के इतका आहे.
-
कोरियन (Korean) – कोरियन ही जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत १४ व्या स्थानी आहे. ही भाषा ७ कोटी ७३ लाख लोकं ही भाषा बोलतात. हा आकडा जागतिक लोकसंख्येच्या १.००४ टक्के इतका आहे.
-
तुर्कीश (Turkish) – जगभरामध्ये ७ कोटी ९४ लोकं तुर्कीश भाषा बोलतात. जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत तुर्कीश भाषा १३ व्या स्थानी आहे. ही आकडेवारी जागतिक लोकसंख्येच्या १.०३१ टक्के इतकी आहे.
-
वू चायनीज (Wu Chinese) – वू चायनीज ही जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीच १२ व्या स्थानी आहे. ही भाषा जगभरातील ८ कोटी १४ लाख लोकं बोलतात. म्हणजेच जगातील १.०५७ टक्के लोकं ही भाषा बोलतात.
-
तेलगू (Telugu) – तेलगू ही सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीमध्ये ११ व्या स्थानी आहे. जगातील १.०६५ टक्के म्हणजेच ८ कोटी २० लाख लोकं ही भाषा बोलतात.
-
मराठी (Marathi) – मराठी ही जगभरात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीमध्ये १० व्या स्थानी आहे. प्रामुख्याने भारतामधील महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली जाते. जागतिक लोकसंख्येच्या १.०७९ टक्के लोक मराठी बोलतात. म्हणजेच जगातील ८ कोटी ३१ लाख लोकं मराठी भाषा बोलतात.
-
पश्चिम पंजाबी (Western Punjabi) – जगातील १.०२४ टक्के म्हणजेच ९ कोटी २७ लाख लोकं ही भाषा बोलतात. सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत ही भाषा ९ व्या स्थानी आहे.
-
जपानी (Japanese) – जपानी भाषा जगभरातील १२ कोटी ८० लाख लोकं बोलतात. ही सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीमध्ये आठव्या स्थानी आहे. जगातील १.६६२ टक्के लोकं ही भाषा बोलतात.
-
रशियन (Russian) – जगातील दोन टक्के लोक रशियन भाषा बोलतात. १५ कोटी ४० लाख लोकं ही भाषा बोलतात. सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत रशियन सातव्या स्थानी आहेत.
-
पोर्तुगीज (Portuguese) – पोर्तुगीज ही जगात सर्वाधिक बोलली जाणारी सहावी भाषा आहे. एकूण जागतिक लोकसंख्येच्या २.८७० टक्के लोकं पोर्तुगीज भाषा बोलतात. पोर्तुगीज बोलणाऱ्यांची संख्या २२ कोटी १० लाख इतकी आहे.
-
बंगाली (Bengali) – बंगाली ही सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे. जगातील २२ कोटी ८० लाख लोकं ही भाषा बोलतात. म्हणजेच जगातील २.९६१ टक्के लोक ही भाषा बोलतात.
-
हिंदी (Hindi) – भारतात सर्वाधिक बोलली जाणारी हिंदी ही जागतील स्तरावरील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. जगातील ३४ कोटी १० लाख लोकं हिंदी भाषा बोलतात. जागतिक लोकसंख्येच्या ४.४२९ लोकं ही भाषा बोलतात.
-
इंग्रजी (English) – इंग्रजी ही भारतात मोठ्या प्रमाणात वापरली जात असली तरी जागतिक स्तरावरील ती तिसऱ्या स्थानी आहे. जगातील ४.९२२ टक्के लोक इंग्रजी भाषा बोलतात. म्हणजेच इंग्रजी बोलणाऱ्यांची संख्या ३७ कोटी ९० लाख इतकी आहे. (फोटो सौजन्य: weareteachers.com)
-
स्पॅनिश (Spanish) – स्पॅनिश ही जगभरात सर्वाधिक लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीमधील दुसऱ्या स्थानी आहे. जगातील ४८ कोटी लोकं ही भाषा बोलतात. हा आकडा जागतिक लोकसंख्येच्या ५.९९४ टक्के इतका आहे. (फोटो सौजन्य: meltonlearning.com.au)
-
मॅण्डरीन चायनीज (Mandarin Chinese) – हो इंग्रजी नाही तर मॅण्डरीन चायनीज ही जगात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. जगातील ९१ कोटी ८० लाख लोकं मॅण्डरीन चायनीज भाषा बोलतात. हा आकडा एकूण जागतिक लोकसंख्येच्या ११.९२२ टक्के इतका आहे.

Looteri Dulhan: ७ महिन्यांत २५ लग्न, ही ‘लुटेरी दुल्हन’ आहे तरी कोण?; पोलिसांच्या जाळ्यात ती अडकली तरी कशी ?