देशात सर्वात पहिल्यांदा मेट्रो सेवा सुरु करुन इतिहास रचणारे कोलकाता शहर आता पुन्हा एकदा इतिहास रचणार आहे. पाण्याखालून धावणारी देशातील पहिली मेट्रोही आता कोलकाता शहरातून धावणार आहे. -
कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशन (KMRC) लवकरच हुगळी नदीखालून धावणारी मेट्रो प्रत्यक्षात आणणार आहे. ईस्ट-वेस्ट प्रोजेक्टवर काम जोमाने सुरू आहे आणि २०२० च्या मार्च महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. -
भूमिगत स्थानक असणाऱ्या फूल बागानचं काम सध्या जोरात सुरु असून लवकरच पूर्ण होणार आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विटर अकाऊंटवर स्थानकाचे फोटो शेअर केले आहेत. -
लवकरच मेट्रो कोलकातामधील प्रवाशांना सेवा देण्यास सुरुवात करेल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
-
ट्रेनला पाण्यापासून वाचवण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा कवच लावण्यात आले आहे. तसेच नदीच्या मधून जाणारा हा मार्ग ५२० मीटर लांब आणि ३० मीटर खोल आहे. नदीखालून ट्रेनला हे अंतर पार करण्यासाठी ६० सेकंदाचा वेळ लागणार आहे. देशातील पहिली पाण्याखालून धावणारी ट्रेन सॉल्टलेक सेक्टर पाच ते हावडा मैदानापर्यंत धावण्यासाठी जवळपास तयार असल्याचं याआधी सांगण्यात आलं होतं. ही देशातील सर्वात स्वस्त मेट्रो असणार आहे. एकूण १५ किमीची ही मेट्रो लाईन असणार आहे. या मेट्रोनं एका स्टेशनहून दुसऱ्या स्टेशनला जाण्याचं तिकीट केवळ पाच रुपये असणार आहे. दरपत्रकानुसार, दोन किमीसाठी पाच रुपये, पाच किमीसाठी १० रुपये, दहा किमीसाठी २० रुपये त्यानंतर शेवटच्या स्टेशनपर्यंत ३० रुपये इतकं भाडं आकारण्यात येणार आहे. -
मेट्रोमध्ये प्रवाशांना प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर, डिटेक्शन सिस्टीमसारखी आधुनिक सुविधा असणार आहेत.

१२ राशींच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? कोणाची चिडचिड कमी तर कोणाची कामे सुरळीत पार पडणार; वाचा राशिभविष्य