-
अझर महमूद हा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आहे. ९० ते २००० या काळात त्याने पाकिस्तानी क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व केले. ( फोटो सौजन्य – इब्बा कुरेशी इन्स्टाग्राम)
-
१६ सप्टेंबर १९९६ रोजी अझर महमूदने भारताविरुद्ध पाकिस्तानकडून डेब्यु केला.
-
१७ मार्च २००७ रोजी अझर महमूद आयर्लंड विरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला.
-
अझर आणि इब्बाला तीन मुले आहेत.
-
सहा ऑक्टोंबर १९९७ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अझर महमूदने कसोटी क्रिकेटमध्ये डेब्यु केला.
-
सुरुवातीला अझर महमूदच्या वडिलांनी त्याच्या क्रिकेट खेळण्याला विरोध केला होता. पण नंतर त्याची प्रतिभा पाहून त्याला पाठिंबा दिला.
-
३१ मे २००१ रोजी इंग्लंडविरुद्ध अझर महमूद शेवटचा कसोटी सामना खेळला.
-
२१ कसोटी सामन्यात अझरने ३५.९४ च्या सरासरीने ३९ विकेट घेतल्या. ५० धावात चार बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
-
२००३ साली त्याने इब्बा कुरेशी बरोबर विवाह केला. त्याची पत्नी ब्रिटीश नागरीक आहे.
-
३९.१३च्या सरासरीने अझरने १४३ एकदिवसीय सामन्यात १२३ विकेट घेतल्या. १८ धावात सहाबळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
-
अझरची पत्नी इब्बा एक पब्लिक रिलेशन कंपनी चालवते. क्रीडा आणि अन्य कार्यक्रम या कंपनीकडून आयोजित केले जातात.
-
अझर महमूदला २०११ साली ब्रिटीश नागरीकत्व मिळाले.
-
ब्रिटनचे नागरिकत्व मिळाल्यानंतर अझर महमूदला २०१२ साली आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली.
-
अझर महमूद आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळला.
-
आयपीएल करीयरमध्ये अझर महमूदने २३ सामन्यात २९ विकेट घेतल्या व ३८८ धावा केल्या. ८० ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती व २० धावात तीन बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत