"फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब ही सोशल मीडिया अकाउंट येत्या रविवारपासून बंद करण्याचा माझा विचार आहे", असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (दि.२) केलं आणि सोशल मीडियामध्ये एकच खळबळ उडाली. मोदींनी सोशल मीडिया सोडण्याबाबत भाष्य का केलं असावं, ते सोशल मीडियाला रामराम का ठोकण्याच्या विचारात असावेत याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. तर, काही युजर्सकडून यावरुन खिल्ली उडवण्याचाही प्रयत्न सुरू आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण आपआपले तर्क मांडतोय. भारत आपला स्वतःचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणणार आहे, दिल्लीतील हिंसाचार, झुंडबळीच्या घटनांमध्ये सोशल मीडियाचा हात, सोशल मीडियापासून लहान मुलांना दूर ठेवण्यासाठी आदर्श घालून देण्याचा प्रयत्न अशी कारणं मोदींनी सोशल मीडियाला रामराम ठोकण्याबाबत केलेल्या ट्विटमागे असू शकतात अशा जोरदार चर्चा सुरू आहेत. त्याचसोबत मोदींनी सोशल मीडिया सोडू नये अशी विनंती बहुतांश नेटकऱ्यांकडून केली जात आहे. मोदींनी ट्विट करताच ट्विटरवर #NoSir या हॅशटॅगचा महापूर आलाय. पाहूया सोशल मीडियावरच्या रिएक्शन – -
मोदींचं पुढचं पाऊल काय असणार याकडे ट्विटर, युट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबूक टक लावून बसलेत
-
उजव्या विचारसरणीचे मोदींना सोशल मीडिया सोडू नका म्हणातायेत, पण डाव्या विचारसरणीचे हे मोदींचं कुठलं नवीन अस्त्र आहे याचाच विचार करत आहेत.
-
या कारणामुळे तर मोदी सोशल मीडिया सोडत नाहीयेत ना…
-
सध्याची परिस्थिती…
-
तुम्ही अनेकांसाठी प्रेरणादायी आहात…प्लिज नका जाऊ…
-
सामान्य नागरिकांनी तुमच्याशी संपर्क साधण्याचा हा सर्वोत्तम पर्याय आहे. प्लिज तुमच्या निर्णयावर पुन्हा विचार करा…कृपया सोशल मीडिया सोडू नका
-
हे ऐकून यांना खूप आनंद झाला असेल…
-
सर मी तुमच्यामुळेच ट्विटरवर आलो…प्लिज तुम्ही सोडू नका
-
नका सोडू…तुमच्या आईलाही निर्णय मान्य नसेल
-
मला तर धकधक व्हायला लागलंय
-
मोदींच्या ट्विटनंतर ट्विटर आणि फेसबुकला आली चक्कर
-
माझ्यासारखे कोट्यवधी लोकं केवळ तुमच्यामुळे सोशल मीडियावर आले आहेत. प्लिज सोशल मीडिया सोडू नका…
-
सर…सोशल मीडियाद्वारेच तुमच्याशी कनेक्ट राहता येतं. प्लिज निर्णयावर पुनर्विचार करा…
-
-
आता आम्ही कसं जगणार
-
एकदम वेळ बदलली, काळ बदलला, सगळं आय़ुष्यच बदललं…
-
-
-
आता या पृथ्वीवर नाही राहायचं…
-
-
-
मोदी सोशल मीडिया सोडणार असल्याचं ऐकल्यानंतर मोदी विरोधकांनाही दुःख अनावर…
-
म्हणून मोदी सोशल मीडिया सोडतायेत…

बापरे! तरुण ११० च्या स्पीडला बुलेट पळवत होता; अचानक ब्रेक मारला अन्… क्षणार्धात घडला भयंकर अपघात, लाईव्ह VIDEO व्हायरल