-
जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान: उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यात असलेलं हे देशातील सर्वात प्रसिद्ध असं राष्ट्रीय उद्यान आहे. विविध प्राणी आणि पक्षांचा हा अधिवास आहे. विशेषतः वाघ, बिबट्या आणि जंगली हत्तींसाठी हे प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर डोंगर, गवताळ प्रदेश, नदीचा भाग इथली ही ठिकाणं कॅमेरॅत कैद करण्यासारखी आहेत. (Source: crazywildlifer/Instagram)
-
बांदिपूर व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यान : हे ठिकाण कर्नाटकमध्ये असून इथं वाघांची विरळ संख्या आहे. या ठिकाणी भारतीय हत्ती मोठ्या प्रमाणावर पहायला मिळतात. त्याचबरोबर हरीण, काळवीट इतर तृणभक्षीय प्राणीही इथे मोठ्या प्रमाणावर आहेत. दक्षिण आशियातील हा हत्तींसाठीचा सर्वांत मोठा आधिवास आहे. (Source: iravishankar/Instagram)
-
रणथंबोर राष्ट्रीय उद्यान : राजस्थानातील सवाई माधवपूर जिल्ह्यात हे ठिकाण आहे. एकेकाळी जयपूरच्या राजघराण्यांतील लोकांसाठी हे शिकारीसाठीचे प्रसिद्ध ठिकाण होते. वाघांसाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. पक्षी निरिक्षण आणि वाघांच्या दर्शनासाठी पर्यटक येथे विशेष भेटी देतात.
-
काझिरंगा राष्ट्रीय उद्यान : आसाममधील कांचनजुरी येथे हे ठिकाण असून जंगलासाठी राखीव आहे. खुरटे गवत आणि गवताळ प्रदेश असे दोन्ही प्रकार इथे पहायला मिळतात. जगातील सर्वाधिक एकशिंगी गेंडे या अभयारण्यात आहेत. त्याचबरोबर हत्ती आणि स्थलांतरीत पक्षी येथे पहायला मिळतात. (Source: sachin_rai_photography/Instagram)
-
कान्हा राष्ट्रीय उद्यान : मध्य प्रदेशातील मंडाला आणि कालघाट या दोन जिल्ह्यांमध्ये विस्तृत जागेवर हे अभयारण्य पसरलेलं आहे. इथले रोमांचकारी लँडस्केप आणि पाण्याचे अनेक स्वच्छ प्रवाह पाहण्यासारखे आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारच्या वनस्पती, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि किटक येथे पहायला मिळतात. (Source: krishnakumartekam/Instagram)
-
सुंदरबन : बंगालच्या त्रिभूज प्रदेशातील हे जगातील सर्वांत मोठे मँग्रुव्ह्जचे (खारफुटी) जंगल आहे. प्रसिद्ध पट्टेदार वाघाचे (रॉयल बंगाल टायगर) हे मूळ घर मानले जाते. त्याचबरोबर मगर आणि विविध प्रकारचे सापही इथे मोठ्या प्रमाणावर पहायला मिळतात. त्याचबरोबर गँगेटिक डॉल्फिन, हॉक्सबिल टर्टल (कासव) आणि मँग्रुव्ह्ज हॉर्सशोअर क्रॅब (खेकडे) यांच्या प्रजाती देखील इथे पहायला मिळतात. (Source: swamptigerchaser/Instagram)
-
गीर राष्ट्रीय उद्यान : गुजरातमध्ये हे ठिकाण असून आशियायी सिंहांच्या संरक्षणासाठी याची निर्मिती करण्यात आली आहे. सिंहांच्या व्यतिरिक्त या ठिकाणी आपल्याला बिबट, चितळ, गिधाड आणि अजगरांच्या प्रजाती देखील पहायला मिळतात. (Source: the_iffy_explorer/Instagram)
-
आरालाम वाईल्डलाईफ सँच्युरी: केरळमधील पश्चिम घाटात पसरलेलं हे विस्तीर्ण अभयारण्य असून हिरव्यागार वनराईनं ते नटलेलं आहे. हत्ती, गौर, सांबर, चितळ, ओरडणारे हरीण, निलगिरी माकडं, हनुमान माकड आणि मलबार जायंट खार यांचा हा नैसर्गिक अधिवास आहे. ट्रेकर्ससाठी देखील हे आवडते ठिकाण आहे. (Source: diaries925/Instagram)
-
सरिस्का टायगर रिझर्व्ह : राजस्थानच्या अलवार जिल्ह्यात हे ठिकाण असून इथे पर्जन्यमान कमी असल्याने रखरखीत जंगल, डोंगर, दऱ्या आणि काही ठिकाणी गवताळ प्रदेश असा भाग इथे पहायला मिळतो. बिबट, जंगली मांजर, पट्टेदार तरस आणि गोल्डल जॅकल (सोनेरी रंगाचा कोल्हा) यांसारखे काही प्राणी येथे पहायला मिळतात. (Source: sariska_shyam_/Instagram)

गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट, १७ वर्षांच्या संसारानंतर पत्नीपासून विभक्त