-
चिकन खाल्ल्याने करोना होत नाही, असा संदेश देण्यासाठी ग्रामस्थांनी अनोखी शक्कल लढवली आहे.
-
सध्या करोनाची दहशत देशभरात असून चिकन खाल्यानं करोना होतो, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-
त्यामुळे ही अफवा असून चिकन खाल्ल्यानं करोना होत नाही.
नागरिकांचा संभ्रम दूर करण्यासाठी चक्क क्रिकेट सामना विजेत्यांना कोंबड्या आणि कोंबडे बक्षीस देण्यात आले आहे. -
होळी व धुलीवंदन सणाचे औचित्य साधून वसईतील पुरापाडा येथील आगरी समाजाने क्रिकेट सामन्याचे आयोजन केलं होतं.
-
ही स्पर्धा जिंकणाऱ्या विजेत्या संघाला ११ कोंबडे आणि चषक तर उपविजेत्या संघाला ११ कोंबड्या आणि चषक देऊन गौरवण्यात आलं.
चिकन खाल्याने करोना आजार होत नाही, तसेच होळीमध्ये पाण्याचा गैरवापर टाळावा. असा सामाजिक संदेश देण्यासाठी गावकऱ्यांनी गावकप नावाने क्रिकेट स्पर्धा भरवली होती. -
गावात आगरी समाजातील सामने पाहण्यासाठी महिलांचा सहभाग अधिक असल्याचे आयोजकांनी सांगितले.
-
होळीचा सण साजरा केल्यानंतर दिवसभर जेष्ठ नागरिक ते लहान मुलांचे असे दहा सामने खेळवले
गावाची एकजूट पाहून इतर समाजातील लोकांनी पुरापाडा ग्रामस्थांचे कौतुक केले. यानंतर सामाजिक संदेश देण्यासाठी प्रतेक वर्षी अशा प्रकारचे सामने भरविणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

IND vs PAK Live Score , Asia Cup 2025 Final: टॉप ऑर्डर कोसळला! पण संजू – तिलकने मिळून टीम इंडियाचा डाव सावरला