-
करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ठप्प होण्याच्या मार्गावर असताना मुंबईच्या अर्थकारणातील महत्त्वाचा घटक बनलेला उत्तर प्रदेश, बिहारमधील कामगारवर्गही आता धास्तावला आहे. (फोटो – प्रदीप दास)
-
एकीकडे व्यवहार बंद होत चालल्याने ओढवलेले तात्पुरत्या बेरोजगारीचे संकट तर दुसरीकडे ‘करोना’चा संसर्ग होण्याची भीती यांमुळे या मजूर वर्गातील बहुसंख्य परप्रांतीय आपापल्या गावी जात आहेत. (फोटो – प्रदीप दास)
-
परिणामी लोकमान्य टिळक टर्मिनससह अनेक रेल्वे स्थानकांवर सध्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या तिकिटांसाठी रांगा लागल्या आहेत. (फोटो – प्रदीप दास)
-
याउलट उत्तरेकडून मुंबईत येणाऱ्या रेल्वेगाडय़ा मात्र, रिकाम्या धावत असल्याचे चित्र आहे. (फोटो – प्रदीप दास)
-
संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या करोनाने मुंबईतदेखील सध्या हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मुंबई शहर मोठय़ा प्रमाणात गजबजलेले असल्याने या ठिकाणी अधिक प्रमाणात हा आजार पसरण्याची भीती या ठिकाणी काम करणाऱ्यांमध्ये आहे.
-
तसेच जर हा आजार वाढल्यास गावाकडे जाणाऱ्या गाडय़ादेखील बंद होतील अशी शंका या कामगारांमध्ये आहे.
-
त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यांतील कामगारांनी सध्या आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
-
परिणामी सध्या लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सीएसटीएम येथून उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या सर्वच गाडय़ा फुल्ल होऊन जात आहेत. (फोटो सौजन्य – निर्मल हरिंद्रन)
-
लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी आठ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत या दोन्ही राज्यांमध्ये आठ ते दहा गाडय़ा जातात. सीएसटीएम येथेही परप्रांतीयांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचं चित्र आहे (फोटो सौजन्य – निर्मल हरिंद्रन)
-
लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळच्या वेळी गोदान, भागलपूर, कामयानी, वाराणसी या चार गाडय़ा तर आठवडय़ाला सुटणाऱ्या इतर गाडय़ा अशा सहा ते सात गाडय़ा येथून दुपारी बारा वाजेपर्यंत सुटतात. (फोटो सौजन्य – निर्मल हरिंद्रन)
-
त्यामुळे सध्या येथील सर्व स्थानके प्रवाशांनी गजबजून गेली आहेत. (फोटो सौजन्य – निर्मल हरिंद्रन)
-
जोपर्यंत करोनाचा कहर कमी होणार नाही, तोपर्यंत गावाकडून येणार नाही अशी प्रतिक्रिया या वेळी काही प्रवाशांनी दिली आहे. (फोटो सौजन्य – निर्मल हरिंद्रन)
-
फक्त मुंबई नाही तर हे चित्र पुण्यातही आहे. पुण्यातून उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालकडे परतणाऱ्या प्रवाशांची संख्या अचानक मोठय़ा प्रमाणावर वाढल्याने रेल्वेकडून जादा गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. (फोटो सौजन्य – अरुल हॉरिझन)
-
पुण्यातून परतणारी ही मंडळी प्रामुख्याने हॉटेल आणि बांधकाम क्षेत्रासह किंवा इतर छोटय़ा व्यवसायात काम करणारी मंडळी असून, स्थानकावर गेल्या काही दिवसांपासून त्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. (फोटो सौजन्य – अरुल हॉरिझन)
-
पुण्यातून परतणारी ही मंडळी प्रामुख्याने हॉटेल आणि बांधकाम क्षेत्रासह किंवा इतर छोटय़ा व्यवसायात काम करणारी मंडळी असून, स्थानकावर गेल्या काही दिवसांपासून त्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. (फोटो सौजन्य – अरुल हॉरिझन)
-
करोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. गर्दी टाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. त्याचा परिणाम चार ते पाच दिवसांपासून रेल्वेवरही दिसून येत होता. स्थानकात गर्दी कमी होती. त्याचप्रमाणे पुणे-मुंबई दरम्यानची डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती आदी गाडय़ांसह लांब पल्ल्याच्या काही गाडय़ांना प्रतिसाद नसल्याने ३१ मार्चपर्यंत त्या गाडय़ा बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र, दोन दिवसांपासून पुणे रेल्वे स्थानकाचे चित्र अचानकपणे बदलून गेले.(फोटो सौजन्य – अरुल हॉरिझन)
-
संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अत्यावश्यक गोष्टी वगळता सर्वच गोष्टी बंद करण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील छोटे व्यवसाय, हॉटेल, बांधकाम क्षेत्र आदी सर्व बंद झाले आहे. (फोटो सौजन्य – अरुल हॉरिझन)
-
त्यातच करोनाची धास्ती असल्याने या व्यवसायात काम करणाऱ्या मंडळींकडून पुणे सोडून मूळ गावी जाण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. (फोटो सौजन्य – अरुल हॉरिझन)
-
त्यामुळे रेल्वेकडे मोठय़ा प्रमाणावर आरक्षण आणि तिकिटाची मागणी होत आहे. पुणे-पटना गाडी रोजच मोठय़ा प्रमाणावर प्रवासी घेऊन धावत आहे. (फोटो सौजन्य – अरुल हॉरिझन)
-
उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या नेहमीच्या गाडय़ा अपुऱ्या ठरत आहेत.(फोटो सौजन्य – अरुल हॉरिझन)
-
प्रवाशांची मागणी झपाटय़ाने वाढली असल्याने उत्तर प्रदेशातील गोरखपूर, बिहारमधील दानापूर आणि पश्चिम बंगालमधील हावडा येथे २० मार्चला जादा गाडय़ा सोडण्यात आल्या. पुण्यातून बल्लारशाह येथेही जादा गाडी सोडण्यात आली आहे. त्यामुळे स्थानकावर दिवसभर प्रवाशांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. गर्दीत न जाण्याचे आणि गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात असताना रेल्वे स्थानकातील या गर्दीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. (फोटो सौजन्य – अरुल हॉरिझन)

Asia Cup Final Anthem Disrespect: शाहीन आफ्रिदी-हारिस रौफने भारताच्या राष्ट्रगीताचा केला अपमान, मैदानावर पाहा काय करत होते?