-
करोना विषाणूचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. याचा सर्वात जास्त फटका देशातील हातावर पोट असणाऱ्या मजुरांना बसलेला आहे. (सर्व छायाचित्र – अरुल हॉरिझन)
-
सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बंद…रोजगार तुटलेला त्यातच सर्व राज्यांच्या सीमा बंद…अशा परिस्थितीत या कामगारांची अधिक कुचंबणा होतेय.
-
पण आपल्या गावची ओढ काही केल्या कमी होत नाही…त्यामुळे अखेरीस या नागरिकांनी पायी चालत आपलं गाव गाठायचं ठरवलं. कर्नाटकातील गुलबर्गा इथले हे मजुर मुंबईतील बोरिवली भागात एका इमारतीवर कामाला होते.
-
मुंबई ते कर्नाटक हा जवळपास ३९० किलोमिटरचा हा प्रवास हे मजुर चालत करणार आहेत, वाटेत अडथळे अनेक येतील पण घराची ओढ काही केल्या यांना थांबू देत नाही.
-
चालून चालून पाय दुखायला लागले की रस्त्याच्या शेजारी थोडा वेळ थांबायचं…काळवंडलेले पाय आणि भेगा त्यांचा संघर्ष सांगत आहेत.
-
कितीही त्रास होत असला तरीही ते दु:ख चेहऱ्यावर आणू न देता प्रवास करत रहायचा हेच या मजुरांनी ठरवलं आहे.
-
-
पुण्यात हडपसरजवळ विसाव्यासाठी हे मजुर काहीकाळ थांबले होते.
-
सोबतीला भाकऱ्या-चटणी आणि टोमॅटो असा बेत यांनी आणलेला आहे.
-
जिथे सावली मिळेल तिकडे दोन घास पोटात ढकलायचे आणि पुढच्या प्रवासासाठी अंगात बळ आणायचं ही खुणगाठ प्रत्येकाने मनाशी पक्की केली आहे.
-
जेवणं झालं की थोडावेळ आहे तिकडेच आराम करायचा…काही जणं इथेच छोटीशी डुलकी काढतात.
-
गावात आपल्या नातेवाईकांना आपली ख्याली-खुशाली कळवायची हीच ती वेळ असते.
-
आपल्या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व मजुरांना वाऱ्यावर सोडू नका अशी सूचना सरकार वारंवार करत आहे, मात्र प्रत्यक्ष असं काहीच घडताना दिसत नाही.
-
करोना असो किंवा आणखी काही कष्टकऱ्यांच्या नशिबी असणारा संघर्ष कायम आहे.
-
अशा खडतर प्रसंगामध्ये अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना मदत करणं हे आपल्या सर्वांचं काम आहे.

“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”