-
करोना आणि लॉकडाउननं संपूर्ण देशाचं चित्र बदलून टाकलं आहे. महाराष्ट्र सरकारनं संचारबंदी लागू केल्यानंतर केंद्र सरकारनं संपूर्ण देशात लॉकडाउन केलं. त्यानंतर सगळीकडं शुकशकाट झाला. (छायाचित्र सौजन्य : आशिष काळे)
-
घरात राहुन दिवस काढल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे लोकांच्या हळूहळू लक्षात आलं. पण, ज्यांची पोट हातावर होती. त्यांचं काय? मग असे कामगार, शेजमजूर, शेतकरी यांना बाहेर पडण्याशिवाय पर्याय राहिला नाही. (फोटो -पवन खेंगरे/ इंडियन एक्स्प्रेस)
-
ज्यांच्याकडे पशुधन आहे, त्यांना तर बाहेर पडण्याशिवाय पर्याय उरला नाही. (फोटो -पवन खेंगरे/ इंडियन एक्स्प्रेस)
-
त्यात मेंढपाळ म्हणजे सतत भटकती करणारा जत्था. आज इथे उद्या तिथे. निश्चित असं काही नसतं. (फोटो -पवन खेंगरे/ इंडियन एक्स्प्रेस)
-
मिळेल त्या रानात थांबायचं, त्यानंतर पुन्हा पुढची वाट धरायची. हे चक्र अनेक दशकांपासून चालत आलेलं. ते लॉकडाउन थांबवू शकला नाही. (फोटो -पवन खेंगरे/ इंडियन एक्स्प्रेस)
-
मेंढपाळ आणि शेळीपालन करणाऱ्यांना रानात जावंच लागत आहेत. मात्र, विदेशातून इंडियात आणि इंडियातून भारतात पसरत असलेल्या संकटाची चाहुल त्यांनाही लागली आहे. त्यामुळेच तोंडाला रुमाल बांधल्याशिवाय हे मेंढपाळही बाहेर पडत नाही. (फोटो -पवन खेंगरे/ इंडियन एक्स्प्रेस)
-
सासवड-नसरापूर रोडवर मेंढ्या आणि बकऱ्या चारण्यासाठी निघालेल्या मेंढपाळांचे दोन जत्थे. चटका लागणाऱ्या उन्हाची पर्वा न करता हे फिरणाऱ्या मेंढपाळांचा हा संघर्ष कॅमेऱ्यांनं टिपला. (फोटो -पवन खेंगरे/ इंडियन एक्स्प्रेस)
-
मेंढ्यांना रस्त्याच्या बाजूनं घेऊन जाणारे मेंढपाळ. (फोटो -पवन खेंगरे/ इंडियन एक्स्प्रेस)
-
शहर ठप्प झाली. रोजगार थांबला. रस्त्यावरची गर्दी गायब झाली. मात्र, ग्रामीण भागात घरात बसून होत नाही. शेतकऱ्याचा सगळा जीव असतो. शेतात असलेल्या मालात. मग घरी बसून कसं होणार. अशा स्थितीतही शेतकरी आणि शेतमजूर शेतात काम करताना दिसत आहे.(फोटो -पवन खेंगरे/ इंडियन एक्स्प्रेस)
-
योग्य ती खबरदारी घेऊन काम कांदे काढणाऱ्या स्त्रिया. (फोटो -पवन खेंगरे/ इंडियन एक्स्प्रेस)
-
मुंबई-पुण्यात करोनाचे रुग्ण आढळले पण दहशत बसली गावांना. व्हॉट्सअपवरून पसरलेल्या अफवांनी गावांमध्ये प्रचंड भीती निर्माण केली. त्यातून वाचायचं म्हणजे संपर्क तोडायचा अशी समजूत झाली आणि गावांनी शहरांशी संपर्क तोडणारे निर्णय घेतले. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर असं चित्र दिसून आलं. (फोटो -पवन खेंगरे/ इंडियन एक्स्प्रेस)
-
पुरंदर किल्याकडे जाणारा रस्ता नारायणपुर गावातील लोकांनी बंद केला आहे. रस्त्यावर लाकडे टाकून रस्ता बंद करण्यात आला आहे. लॉकडाउनच्या काळात पर्यटक येऊ नये म्हणून गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. (फोटो -पवन खेंगरे/ इंडियन एक्स्प्रेस)
-
रस्ते अडवण्याच्या निर्णयाचा आणि कृतीमुळे गावकऱ्यांनाही दुसऱ्या गावात वा शहरात जाताना त्रास सहन करावा लागत आहे. (फोटो -पवन खेंगरे/ इंडियन एक्स्प्रेस)
-
लॉकडाउनमुळे रस्त्यावर शांतता आहे. संगमवाडी येथे बसेस रस्त्याच्या बाजूला लावल्या आहेत. त्या बसेसवर काही पक्षी बसून विसावा घेत आहेत. तर काही पक्षी आकाशात झेपावलेत. त्या क्षणाला कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं आहे. (फोटो -अरूण होरायझन/ इंडियन एक्स्प्रेस)
-
करोना व्हायरसच्या महामारीमुळे देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. अशा स्थितीत वाघोली येथे अंगणवाडी सेविका जयश्री सोनवणे आणि लता चितळकर आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य पार पाडत आहेत. प्रत्येक घरात जाऊन कुटुंबातील लोकांची ट्रव्हल हिस्ट्रीची चौकशी करत आहेत. (फोटो -अरूण होरायझन/ इंडियन एक्स्प्रेस)

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”