-
पिंपरी : करोनाबाबत जनजागृतीकरण्यासाठी प्रशासनाबरोबरच काही तरुण आपल्या कलेच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत. शहरातील मुख्य चौकांमधील रस्त्यांवर पेंटिंगच्या माध्यमातून नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन काही कलाकार तरुणांनी केलं आहे. (सर्व छायाचित्रे – कृष्णा पांचाळ)
-
'कोई रोड पर ना निकले' अशा आशयाचे हे पेटिंग या कलाकार तरुणांनी रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे साकारले आहेत.
-
गजानन बाजड, सिद्धार्थ इंगळे आणि अमोल सोमवंशी अशी या कलाकारांची नाव असून हे तिघे सध्या शहरात पेंटिंगच्या माध्यमातून करोनाबाबत जनजागृती करीत आहेत.
-
शहरातील १५ ते १६ मुख्य चौकामध्ये त्यांनी 'कोई रोड पर ना निकले' असा संदेश देणारे पेंटिंग साकारले आहेत.
-
अनोख्या पद्धतीनं करोनाविषयी जनजागृती करण्याचं ठरवल्यानंतर बाजड यांनी मित्रांनाही मदतीबाबत विचारणा केली, यासाठी त्यांचे मित्रही तयार झाले.
-
भोसरी : दिघी रोड येथील मुख्य चौकातील रस्त्यावरही अशा प्रकारे संदेश देणारे पेंटिंग साकारण्यात आले आहे.
-
पिंपरीतील मुख्य आंबेडकर चौकात साकारण्यात आलेले पेटिंग. ही पेटिंग्ज पाहून घरातून बाहेर पडलेल्या लोकांवर निश्चित परिणाम होईल आणि ते घरातच थांबतील अशी आशा या कलाकारांनी व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”