-
सध्या संपूर्ण देशात करोना विषाणूने थैमान घातलं आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे यासारख्या महत्वाच्या शहरांत करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. खबरदारीचे उपाय म्हणून पुण्यातील काही भाग पोलिसांनी सिल केले आहेत. (फोटो – अरुल हॉरिझॉन)
-
लोकांना घराबाहेर पडण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे. यासाठी कात्रज भागात आज पुणे पोलिसांच्या पथकाने रुट मार्च काढला. (फोटो – अरुल हॉरिझॉन)
-
पुणे शहरात करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण वाढतच चालले आहे. बुधवारी सकाळी पाच बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. (फोटो – अरुल हॉरिझॉन)
-
त्यानंतर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारात आणखी तीन करोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. (फोटो – अरुल हॉरिझॉन)
-
त्यामुळे आज दिवसभरात पुणे शहरात करोनाबाधित रुग्णांच्या मृतांचा आकडा ८वर पोहोचला आहे. तर एकूण मृतांची संख्या १६ झाली आहे. (फोटो – अरुल हॉरिझॉन)
-
सकाळापासून शहरातील नायडू रुग्णालयात -१, नोबेल रुग्णालयात – १ आणि ससून रुग्णालयात ३ अशी एकूण ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. (फोटो – अरुल हॉरिझॉन)
-
तसेच पुण्यात सकाळपासून २५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आजवर शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या १५४ वर पोहोचली आहे, अशी माहिती महापौर मुलधीर मोहोळ यांनी दिली. (फोटो – अरुल हॉरिझॉन)
-
पुणे शहरात आज अखेर १५६७ नागरिकांनी करोनाची तपासणी केली असून त्यापैकी १४१७ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. तर १५८ रुग्ण बाधित आढळले आहेत. (फोटो – अरुल हॉरिझॉन)
-
शहरात करोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत. (फोटो – अरुल हॉरिझॉन)
-
पुण्यातला गुल टेकडी हा भाग करोना विषाणूचा हॉटस्पॉट जाहीर करण्यात आल्यामुळे…पोलिसांनी आज या भागात बॅरिकेट लावत संपूर्ण परिसर सिल केला आहे. (फोटो – आशिष काळे)
-
या परिसरातील दुकानं बंद करण्यात आलेली असून नागरिकांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. (फोटो – आशिष काळे)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग